आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानचे PM पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर, मुंबईवरुन सुटणाऱ्या बुलेट ट्रेनचे करणार भूमिपूजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिंजो आबे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. (फाइल फोटो) - Divya Marathi
शिंजो आबे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. (फाइल फोटो)
नवी दिल्ली - जपानचे पंतप्रधान शिंजो आबे पुढील महिन्यात 3 दिवस भारत भेटीवर येत आहेत. 13 ते 15 सप्टेंबर असा त्यांचा भारत दौरा असणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला आबे उपस्थित राहाणार आहेत. मोदी आणि आबे यांची द्विपक्षीय चर्चा होईल. 
 
 मुंबई-अहमदाबाद हायस्पीट रेल्वेचे भुमिपूजन... 
 - एएनआयने जपान टाइम्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की शिंजो आबे 13 ते 15 सप्टेंबर असे तीन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत. त्यात म्हटल्यानुसार, आबे मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे लिंक भूमिपूजन सोहळ्याला ते उपस्थित राहाणार आहेत. या प्रकल्पावरील अंदाजीत खर्च एकूण 97,636 कोटी रुपये आहे. या रेल्वे लिंक प्रकल्पामध्ये जपानच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे.  
 - आबे यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात उभय देशांच्या समकक्ष नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. 
 
 बुलेट ट्रेनमध्ये शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर 
 - मुंबई - अहमदाबाद रेल्वे लिंक मार्ग 500 किलोमीटर असणार आहे. 2023 मध्ये या मार्गावर बुलेट ट्रेन धावण्याची आपेक्षा आहे. या हायस्पीड ट्रेनमध्ये जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरक्षित आणि आरामदायी यात्रा हे या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. 
 
दुसऱ्या प्रकल्पांमध्ये या तंत्रज्ञानाच्या वापराला मिळणार परवानगी...
 - शिंजो आबे यांच्या दौऱ्यामध्ये भारतातील दुसऱ्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासांठीही जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानाच्या वापराला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. 
 - गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी आबे यांच्यासोबत शिंकानसेन तंत्रज्ञानावर चालणाऱ्या बुलेट ट्रेनने प्रवास केला होता. यावेळी मोदी कावासाकी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बुलेट ट्रेन प्लॅंटवरही गेले होते. ही कंपनी शिंकानसेन कारची निर्मिती करते. 
बातम्या आणखी आहेत...