आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena BJP Mahayuti Top In Maharashtra, IBN 7 Survey

महाराष्‍ट्रात शिवसेना-भाजप महायुतीची सरशी,आयबीएन-7चे सर्वेक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आजमितीला निवडणुका झाल्यास महाराष्‍ट्रात शिवसेना-भाजप-रिपाइं व स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीला आघाडी मिळू शकेल. मध्य प्रदेश आणि गुजरातेतही भाजपचीच सरशी राहील. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनाच या राज्यांत पहिली पसंती आहे.
आयबीएन-सीएनएन या वृत्तवाहिनीसाठी सीएसडीएसने 18 राज्यांत सर्वेक्षण केले. 5 ते 15 जानेवारी या काळात केलेल्या सर्वेक्षणात लोकसभेच्या 291 मतदारसंघांतील 18,591 मतदारांची पाहणी करण्यात आली. वृत्तवाहिनीने महाराष्‍ट्रासह मध्य प्रदेश, गुजरातचे आकडे बुधवारी जाहीर केले. छत्तीसगडमध्ये भाजपला 50 आणि काँग्रेसला 34 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तथापि, जागांच्या बाबतीत मात्र भाष्य नाही.
महाराष्‍ट्र (48 जागा)
पक्ष आजची स्थिती मते
महायुती 25-33 44%
आघाडी 12-20 35%
इतर 01-05 21%
पंतप्रधान म्हणून पसंती (राज्यनिहाय)
राज्य नरेंद्र मोदी राहुल गांधी
महाराष्‍ट्र 40% 14%
गुजरात 46% 16%
मध्य प्रदेश 46% 20%
‘आप’ला दहा जागा
इंडिया टुडे/ सी व्होटर सर्वेक्षणानुसार ‘आप’ला देशात 10 जागा मिळतील. यात महाराष्‍ट्रातील एक जागा असेल.