आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Divya Marathi, Rajan Vichare

चपाती प्रकरण: पोलिस ‘एटीआर’ दाखल करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी महाराष्‍ट्र सदनातील कर्मचा-याला चपाती खाण्यासाठी बळजबरी करून रोजा मोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करणा-या याचिकेवर न्यायालयाने पोलिसांना मंगळवारी अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट(एटीआर) दाखल करण्याचे आदेश बजावले. महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी 10 सप्टेंबर रोजी एटीआर दाखल करण्याचे आदेश दिले.
सामाजिक कार्यकर्ते कामरान सिद्दीकी यांच्या याचिकेवरून हे निर्देश दिले. ज्याला बळजबरी करण्यात आली तो व्यक्ती समोर आला नसताना आपण तक्रार का दाखल केली. या प्रकरणात तुम्हाला कोणती इजा झाली, अशी विचारणा सिद्दीकी यांच्याकडे करण्यात आली. यावर सिद्दीकी आणि त्यांचे वकील कामरान मलिक व विशाल मलिक म्हणाले, आपण सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती आहोत. याआधी विविध विषयांवर आम्ही याचिका दाखल केल्या आहेत. ज्या कर्मचा-यावर हल्ला झाला तो कंत्राटी कर्मचारी आहे, त्यामुळे या प्रकरणात तो तक्रार दाखल करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर न्यायालयाने एटीआर दाखल केल्यानंतर सुनावणी घेतली जाईल, असे सांगितले. खासदार विचारे यांच्याविरुद्ध कलम 153 ‘अ’नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.