आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivaji Memorial Foundation Lay In April, Said Mete

शिवस्मारक भूमिपूजन एप्रिलमध्ये होणार, आमदार मेटे यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला परवानगी दिली असली तरी काही विभागांच्या मान्यता मिळायच्या असल्याने शिवजयंतीला अपेक्षित असलेले स्मारकाचे भूमिपूजन एप्रिलपर्यंत लांबणीवर पडू शकते, अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकाचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले असले तरी पर्यावरण आणि अन्य काही विभागाच्या अशा तीन परवानग्या मिळायच्या असल्याचे मेटे यांनी सांगितले. या स्मारकासाठी अर्थसंकल्पात पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटीपासून समुद्रातील जवळपास १६ हेक्टर जागेवर हे स्मारक बांधले जाणार आहे. परवानग्या लवकर मिळाव्यात यासाठी स्मारक समितीकडून प्रयत्न सुरू असल्याची माहितीही मेटे यांनी दिली.

पुढे वाचा, नगर-परळी रेल्वेसाठी प्रभूंना साकडे