आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे काम नीट करा, मग राजकारणात नाक खुपसा; उद्धव यांचा अमर्त्‍य सेनांना सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वक्तव्य करणारे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या भारतरत्न पुरस्कारावरून सुरु झालेल्या वादात शिवसेनेनेही उडी घेतली आहे. अमर्त्य सेन अर्थतज्ज्ञ आहेत म्हणजे नेमके काय करतात असा प्रश्न गरीबांना पडला आहे अशा शब्दात शिवसेनेने त्यांच्यावर टिका केली आहे. पण सेन यांचा पुरस्कार परत करण्याची मागणीही योग्य नाही अशा कानपिचक्या भाजप खासदाराला दिल्या आहेत. अमर्त्य सेन यांनी पुरस्कार परत करावा अशी मागणी त्यांच्या टिकाकारांनी करणेही योग्य नाही. देशातील अर्थव्यवस्थेचे दिवाळे वाजले आहे.

गरीबी वाढली आहे. महागाईने इस्कोट केला आहे.हे सर्व मोदींनी केले नाही व अर्थशास्रातील नोबेल पुरस्कार मिळवूनही देशातल्या बिघडत्या अर्थव्यवस्थेवर अमर्त्य सेनकडे औषध नाही.त्यांना लोकांनी आधी तुमचे काम नीट करा व मग राजकारणात नाक खुपसा असे विचारले तर त्यांच्याकडे काय उत्तर आहे असा सवाल उध्दव ठाकरे यांनी केला आहे.