आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena MP Chandrakant Khaire Is Demanding Ram Mandir In Ayodhya

खासदार चंद्रकांत खैरेंची राममंदिर उभारणीची मागणी, लोकसभेत गदारोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि खासदारांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत माफी मागण्याची वेळ आलेली असतानाच त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी सभागृहात वादग्रस्त राममंदिराचा विषय उपस्थित करुन सरकारला आणखी अडचणीत आणले आहे. खैरेंच्या राम मंदिराच्या मागणीमुळे सभागृहात गदारोळ झाला. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी त्यांना हा प्रश्न न्यायालयात प्रलिंबित असल्याचे सांगितले.
औरंगाबादचे खासदार आणि शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी आज (सोमवार) लोकसभेत अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी पंतप्रथान मोदींनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी पंतप्रधान सभागृहात उपस्थित नव्हते. शुन्य प्रहरात खासदार खैरे यांनी हा विषय उपस्थित केला. यामुळे सभागृहात गदारोळ सुरु झाला. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सदस्यांना शांततेचे आवाहन केले. त्या गदारोळातच खासदार खैरे म्हणाले, 'राममंदिर बाधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला पाहिजे. अयोध्येत मंदिर उभारण्यासाठी आम्ही कारसेवा केली. लाठ्या काठ्या खाल्या आहेत. अयोध्येर राममंदिर झाले पाहिजे, ही सर्व हिंदूची इच्छा आहे.'
यावेळी खैरेंनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भाजपचे पूर्ण बहुमत आले तर मंदिर उभारु या घोषणेचीही आठवण करुन देत, राममंदिराची मागणी केली.
राममंदिराचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याची आठवण लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्यांना करून दिली. मात्र, मला माझे म्हणणे मांडू द्या, असे सांगत खैरेंनी हा विषय उपस्थित केला.