नवी दिल्ली: मोदी सरकारच्या आज होणार्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे खासदार अनिल देसाईसुध्दा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 22 खासदार मंत्रीपदाची शपथ घेतील. हा शपथसोहळा दुपारी 1.30 वाजता पार पडेल.
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या सुचनेनंतरच अनिल देसाई शपथ घेतील अशी माहिती सुत्रांनी दिली. मात्र अनिल देसाईंना कोणत खाते दिले जाईल याबद्दल अजून कसलीच माहिती उपलब्ध नाही. अनिल देसाई थोड्याच वेळात दिल्लीत पोहोचतील. त्यानंतर देसाई राष्ट्रपती भवनात जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतील.
पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या या पहिल्या विस्तारात चार कॅबिनेट, 15 राज्यमंत्री आणि तीन स्वतंत्र प्रभाराचा समावेश असणार आहे.