आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैतापूर प्रकल्पाला विरोध: शिवसेनेच्या खासदारांची पंतप्रधानांकडून बोळवण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासाठी जैतापूर अणुउर्जा हा ड्रीम प्रकल्प अाहे. मात्र, त्याला विराेध करणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांना बऱ्याच प्रतिक्षेनंतर माेदींनी वेळ दिला अाणि बघताे, पाहताे अशी बाेळवण करून परत पाठविले.

जैतापुरचा अणुउर्जा प्रकल्प हाेणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अाहे. तर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शिवसेनेचा विराेध जराही मनावर न घेता या प्रकल्पासाठी हालचाली सुरु केल्या अाहेत. मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी काही ज्येष्ठ खासदारांची कानउघाडणी केली. शिवसेना अध्यक्षांच्याच सूचना असल्याने शिवसेनेच्या अकरा खासदारांनी बुधवरी सकाळी पंतप्रधान कार्यालय गाठले. तेथील अधिकाऱ्यांना गेल्या १५ दिवसांपासून अाम्ही वेळ मागताे परंतु अाम्हाला वेळ दिल्या जात नाही असा कांगावा केला. खासदार अानंदराव अडसुळ थाेडे अाक्रमक झाले.शिवसेनेच्या खासदार संतापल्याचा व नाराज असल्याचा निराेप पंतप्रधानांना देण्यात अाला. त्यानंतर पंतप्रधानांनी दुपारी ३.३० वाजता भेटायला बाेलावले. १५ मिनिटे ताटकळत ठेवल्यानंतर पंतप्रधान भेटले. खासदारांनी जैतापूर प्रकल्पाविराेधात अापली भूमिका त्यांच्या कानावर घातली.

माेदींनी शांतपणे त्यांचे एेकूण घेत मी तुमचा विषय तज्ज्ञांच्या समितीकडे पाठविताे असे सांगत ही भेट गुंडाळली.