आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Not Will Seek Forgiveness From Muslims: Sanjay Raut News In Marathi

\'शिवसेना मुस्लिमांची माफी मागणार नाही, जे केलं त्याचा अभिमान आहे\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुस्लिम मतांसाठी भाजप काहीही करण्यास सध्या तयार आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मंगळवारी, ‘पक्षाच्या हातून कधी, काही चुका झाल्या असतील, तर त्यासाठी माफी मागू. यात आम्हाला कमीपणा नाही,’ अशा शब्दांत मुस्लिमांसमोर बोलताना भूमिका मांडली.
भाजपाध्यक्षांच्या या भूमिकेला शिवसेनेने मात्र नाकारले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजप माफी मागण्यास तयार असले तरी, आम्ही माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राजनाथसिंहाचया वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'आम्ही जे केले त्याचा आम्हाला अभिमान आहे.'
शिवसेनेच्या या भूमिकेमुळे दंगलीमध्ये शिवसेनेची भूमिका काय होती, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवसेनेचा 2002 साली गोध्रा येथे झालेल्या दंगलींना पाठिंबा होता का, दंगलीमध्ये शिवसैनिक सहभागी होते का, असाही सवाल आता विचारला जात आहे.

पुढील स्लाइडमध्ये, काँग्रेसचे मुस्लिम प्रेम पुतणामावशीचे