आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना काँग्रेसने उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली - संजय राऊत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) उपराष्ट्रपतीपदासाठी व्यंकय्या नायडू यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदासाठी उत्तर भारतातील उमेदवार दिल्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी दक्षिण भारतातील नेत्याला उमेदवारी देऊन बॅलेन्स राखण्याचे काम भाजप करताना दिसत आहे. दुसरीकडे, शिवसेनेने यूपीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वक्तव्यावर म्हटले आहे, 'मॅडमजी (सोनिया गांधी) गोपाळकृष्ण गांधी यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीला विरोध केला होता. याकूबाल फासाच्या तख्तापासून वाचवण्यासाठी त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. अशा व्यक्तीला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देणे ही कोणती मानसिकता आहे? अशा व्यक्तीला तुम्ही उपराष्ट्रपती बनविणार आहात का?'
 
काँग्रेसचा पलटवार, शिवसेनेने पुरावे द्यावे 
- राऊत म्हणाले, 'आम्ही विरोध केला नसता, मात्र जेव्हा देशहिताचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा विषय येतो तेव्हा विचार करावा लागतो. याकूबने दहशतवाद्यांना साथ दिली होती. गोपाळकृष्ण गांधींनी अशा व्यक्तीची फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी सुरु झालेल्या मोहिमेचे नेतृत्व केले होते. शिक्षा रद्द व्हावी यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहिले होते.'
- शिवसेनेच्या या हल्ल्याला काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या गोपाळकृष्ण गांधी यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी शिवसेनेने पुरावे द्यावे. 
- गोपाळकृष्ण गांधी मंगळवारी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपच्या संसदीय मंडळाची आज बैठक आहे त्यात एनडीएच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होऊ शकते. 
- भाजपच्या वतीने ज्येष्ठ खासदार आणि केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि निर्मला सीतारमण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नायडू यांचे नाव निश्चित मानले जात आहे. 
 
काय म्हणाल्या होत्या सोनिया गांधी 
- राष्ट्रपती पदासाठी मतदान करण्यापूर्वी सोनिया गांधी म्हणाल्या होत्या, 'ही लढाई हीन विचार आणि धर्मांध शक्तींविरोधात आहे. या लढाईत आकडे आमच्या विरोधात असू शकतात परंतू आम्हाला एकजुटीने याविरोधात लढले पाहिजे. देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मीरा कुमार आणि गोपाळकृष्ण गांधी यांना राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती बनविले जाणार आहे. त्यासाठी आमची सर्वांची एकजूट आहे.'
- राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. भारतीय संविधान आणि कायद्याचे रक्षण करण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते. हीन आणि धार्मांध विचारसरणीच्या लोकांच्या भरोवशावर हा देश आम्ही सोडू शकत नाही. 
बातम्या आणखी आहेत...