आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुखर्जी दुसऱ्यांदा राष्ट्रपती व्हावेत : शिवसेनेची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांची या पदावर निवड व्हावी, अशी शिवसेनेची इच्छा आहे. मुखर्जी यांनी प्रभावी कार्यपद्धतीतून देशाचे सर्वोत्तम राष्ट्रपती म्हणून ठसा उमटवला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसने मात्र पक्षनेतृत्व याबाबत निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया दिली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण पुढील आठवड्यात राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. मुखर्जी यांनी गेल्या पाच वर्षांत आपली या पदावर काम करण्याची क्षमता सिद्ध केली असल्याचे नमूद करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरणे तसेच व्यावहारिक बाबींवर मुखर्जी यांचा अनुभव दांडगा असल्याचे सांगितले.
राष्ट्रपतिपदासाठी दुस ऱ्यांदा मुखर्जी यांना सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा म्हणून शिवसेना आवाहन करणार आहे का, असे विचारले असता याबाबतचा निर्णय शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात व केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचे भाजपशी असलेले संबंध ताणले गेले असताना राऊत यांनी केलेले हे वक्तव्य नवा वाद पेटवू शकते.
बातम्या आणखी आहेत...