आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2017चा संकल्प शांत राहा, Tweets बंद करा,सुषमांना टारगेट करणार्‍या शोभा डेंवर ट्विटराईट्स खवळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहाणार्‍या शोभा डे यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना टार्गेट करणारे 'ट्वीट' करून वाद ओढवून घेतला आहे. '2017चा संकल्प- शांत राहा आणि ट्वीट थांबवा', असा सल्ला शोभा डे यांनी सुषमा स्वराज यांना दिला आहे. मात्र, डे यांचे ट्वीट वाचून ट्विटराईट्स चांगलेच खवळले आहेत. स्वराज यांची बाजू घेत ट्विटराईट्सनी शोभा डे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

एक दिवस तुम्हाला विमानतळावर त्यांची गरज भासेल आणि त्यांच्याकडे ट्विटरवरुन याचना कराल’ असे संयमी रिट्‍विट करून डे यांच्यावर नेटिझन्सनी तोंडसुख घेतले आहे. 

दरम्यान, देशात किंवा देशाबाहेर अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांनी ट्विटरवरुन मदत मागितल्यास सुषमा स्वराज याची तातडीने दखल घेतात. त्यांना शक्य ती मदत  करण्याचा स्वराज यांचा प्रयत्न असतो. या स्वभावामुळे स्वराज यांचे सोशल मीडियावर कौतुकही केले जाते. हाच मुद्दा पकडून शोभा डे यांनी सुषमा स्वराज यांना टारगेट करणारे ट्वीट केले आहे.

ट्विटराईट्सनी शोभा डे यांच्याबाबत आणखी काय लिहिले...?
- शोभा डे यांनी शुक्रवारी ट्वीट करून सुषमा स्वराज यांना टारगेट केले. त्यावरून डे त्यांच्यावर ट्‍विटरवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. 
- 'शोभा डे, खरा तर हा संपल्प तुम्ही करायला हवा', असा टोला शालिनी नामक एक यूजरने ट्वीट केले आहे.  
- 'एक दिवस तुम्हाला विमानतळावर त्यांची गरज भासेल आणि त्यांच्याकडे ट्विटरवरुन याचना कराल’ असे रिट्‍विट करण्यात आले आहे. 
- शोभा डे यांना केवळ प्रसिद्धी हवी असते. त्यांच्या हिम्मत असती तर त्यांनी सुषमा यांना टॅग केले असते, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटरवर उमटल्या आहेत.

पुढील स्लाइड्‍वर वाचा, ट्विटराईट्सनी शोभा डे यांच्यावर कसा केला हल्लाबोल...? 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...