आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लाम स्विकारला नाही तर वेश्या करण्याची धमकी देणार्‍या रकीबुलचे मंत्र्यांशी संबंध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/रांची (झारखंड) - राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेवसोबत हिंदू असल्याचा बनाव करुन लग्न करणारा आणि नंतर इस्लाम धर्म स्विकाराण्यासाठी दबाव टाकणारा रंजित कोहली उर्फ रकीबुल हसन रांची पोलिसांच्या ताब्यात आला आहे. आरोपी रंजित उर्फ रकीबुल हसनला आज (बुधवार) दिल्ली कोर्टाने तीन दिवसांच्या ट्रांझीट रिमांडवर पाठविले आहे. त्याचे झारखंडमधील अनेक मंत्र्यांशी जवळचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. तसेच अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी त्याच्या घरी नेहमी येत होते, असा दावा ताराने केला आहे.
झारखंडमधील या हायप्रोफाइल प्रकरणातील आरोपी रंजित कोहली उर्फ रकीबुल हसन आणि त्याची आई कौशल्या राणी उर्फ कैसर परवीन यांच्या मंगळवारी रात्री 10 वाजता दिल्लीत मुसक्या आवळण्यात आल्या. राष्ट्रीय नेमबाज (शुटर) तारा शाहदेवचा आरोप आहे, की रंजित उर्फ रकीबुल आणि त्याच्या आईने इस्लाम धर्म कबुल करण्यासाठी दाबव टाकला होता. तेसे केले नाही तर, वेश्याव्यवसाय करायला लावू अशी धमकी या मायलेकांनी दिली होती.
रांची आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त टीमने मंगळवारी रात्री दिल्लीतील सरोजीनी नगर येथे छापा मारुन त्यांना अटक केली. रकीबुल याचा लॅपटॉट आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांना सरोजीनी नगर पोलिस स्टेशनमध्येच ठेवण्यात आले.

रकीबुलचे झारखंडच्या मंत्र्यांशी संबंध
तीन दिवसांच्या रिमांडनंतर आरोपी रकीबुल हसनला चौकशीसाठी झारखंडला नेण्याची शक्यता आहे. त्याचे झारखंड सरकारमधील दोन कॅबिनेट मंत्र्यांशी जवळचे संबंध आहे. त्यापैकी एक अल्पसंख्याक मंत्री हाजी हुसैन अन्सारी तर दुसरे नगर विकास मंत्री सुरेश पासवान आहेत.
माध्यमांनी अन्सारी यांना विचारले असता, त्यांनी एक वर्षापासून रकीबुलला ओळखत असल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी त्याला निमंत्रीत केले होते. तेव्हा त्याने इस्लाम स्विकारला असल्याचे सांगितले होते. रकीबुल हसनचे म्हणणे आहे, को तो शीख आहे. मात्र, 2007 पासून नमाज पठन देखील करीत आहे. रांचीच्या गुरुद्वारा कमिटीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की रंजीत रांचीच्या कोणत्याही गुरुद्वारामध्ये कधीही आलेला नाही.
रकीबुलचा दावा, मी प्रथमपासून हिंदू
रकीबुल हसन उर्फ रंजीत कोहलीला आज दिल्लीत कोर्टात हजर करण्यात आले. तेव्हा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर तो म्हणाला, मी प्रथमपासून हिंदूच आहे. त्याच्या पत्नीने लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचे त्याने सांगितले. रंजीत म्हणाला, की मी शीख धर्मीय आहे.
तारा शाहदेवने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्याची मागणी केली आहे.

पोलिस अधिकार्‍यांशी रंजितची मैत्री
ताराचा आरोप आहे, की झारखंडमधील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी रंजित उर्फ रकीबुलच्या संपर्कात आहेत. ते नेहमी त्याच्या घरी येत-जात होते. बहुतेकवेळेस ते सिव्हिल ड्रेसमध्ये असत. रंजित कधी त्यांची ओळख आयजी तर कधी डीआयजी असल्याचे करुन देत होता. तारा ज्यांना ओळखते ते झारखंडचे मंत्री हाजी हुसैन अन्सारी आणि सुरेश पासवान आहेत. रंजीतच्या बोलण्यामध्ये कोर्टाची प्रकरणे मॅनेज करण्यासंबंधीचा उल्लेख नेहमी राहात होता.

पुढील स्लाइडमध्ये, तारा आणि रंजितच्या लग्नाचे छायाचित्र
छायाचित्र - दिल्ली पोलिसांच्या ताब्यातील रकीबुल हसन.