आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shri Rajnath Singh On Role Of Muslims Sorry To Muslim Leaders For Bjp Past

'आमच्याकडून चुका झाल्यातर नतमस्तक होऊन माफी मागू, 2002 आधीही दंगली झाल्या'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी काही महिन्यांवर असतानाच भारतीय जनता पक्षाने मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह म्हणाले, 'जर आमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर, मी तुम्हाला विश्वास देतो, आम्ही नतमस्तक होऊन तुमची माफी मागू. ' त्यासोबतच राजनाथ सिंह यांनी दंगलमुक्त भारत निर्माण करण्याचे आश्वासन दिले.
राजनाथ सिंह दिल्लीत मुस्लिम नेत्यांसोबतच्या एका चर्चासत्रात सहभाग झाले होते. एनडीएमसी येथे आयोजित 'मुस्लिमांची भूमिका' या विषयावर आयोजित या चर्चासत्रात राजनाथ सिंह यांच्यासह अरुण जेटली, मुख्तार अब्बास नक्वी, शाहनवाज हुसैन उपस्थित होते.
काँग्रेसवर हल्लाबोल
भाजप काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. येथेही राजनाथ यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'देशात सध्या एकाच दंगलीवर चर्चा केली जाते. ती म्हणजे, 2002 ची दंगल. हितेंद्र देसाईं मुख्यमंत्री होते तेव्हा दंगली झाल्या नाहीत का,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
देशाच्या फाळणीसाठी काँग्रेसला जबाबदार धरत राजनाथ म्हणाले, ज्यांनी देशाची फाळणी केली ते ख-या अर्थाने जातियवादी आहेत, आम्ही नाही. आम्ही राजकारण सत्तेसाठी नाही तर, राष्ट्र निर्माणासाठी करीत आहोत.