आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shtrughna Sinha Called Rahul Gandhi A Shining Star In Tweet

शपथविधीपूर्वी शत्रुघ्न सिन्हांचे ट्विट, राहुल गांधींना म्हटले Rising Star

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारच्या निकालानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीश कुमारांची भेट घेतली होती. - Divya Marathi
बिहारच्या निकालानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीश कुमारांची भेट घेतली होती.
नवी दिल्ली - नितीश कुमार यांनी शपथ घेण्याच्या काही तास आधी भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सुमारे 7 वेळा ट्विट करत पक्षाच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. या ट्विट्समध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी एकिककडे नितीश आणि लालू यांनी नव्या सरकारसाठी शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी हे Risingf Star उगवते नेतृत्व असल्याचेही म्हटले आहे. बिहार निवडणुकीत काँग्रेसला 27 जागा मिळाल्या आहेत.

शपथविधीत उपस्थिती नाही
शत्रुघ्न सिन्हा हे नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्याला मात्र उपस्थित नव्हते. त्याचे कारण म्हणजे, ते कुटुंबासह जगन्नाथपुरी येथे दर्शनासाठी गेले आहेत. मी न जाण्याचे कारण माझ्या मित्राला (नितीशकुमार) सांगितले आहे, असे ते म्हणाले. बिहारमधील पराभवानंतर भाजप नेत्यांना सद्बुद्धी यावी अशी प्रार्थना भगवान जगन्नाथाकडे करणार असल्याचे ते म्हणाले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, शत्रुघ्न सिन्हा यांनी केलेले ट्विट्स...