आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shyam Benegal To Head Panel To Revamp Censor Board

‘सेन्सॉर’च्या पुनर्रचनेसाठी बेनेगल समिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारने सेन्सॉर बोर्डाच्या पुनर्गठनासाठी शुक्रवारी प्रख्यात चित्रपट निर्माते-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना केली. समिती दोन महिन्यांत अहवाल सोपवेल.

या समितीत चित्रपट निर्माते ओमप्रकाश मेहरा, जाहिरात निर्माते पीयूष पांडे, चित्रपट समीक्षक भावना सोमय्या, राष्ट्रीय चित्रपट विकास परिषदेच्या व्यवस्थापकीय संचालक नीना लाठ गुप्ता आणि संयुक्त सचिव (चित्रपट) संजय मूर्ती यांचा समावेश आहे. या समितीच्या शिफारशींमुळे समग्र आराखडा तयार होईल आणि चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी असणाऱ्यांसाठी तो मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा आहे, असे सरकारने म्हटले आहे.