आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shyam Saran Committee Has Not Reported Any Encroachment By China

चीनने बळकावला भारताचा भूभाग, संरक्षण मंत्र्यांनी फेटाळले वृत्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- चीनच्‍या घुसखोरीवरुन संसदेमध्‍ये आज (शुक्रवारी) वातावरण चांगलेच तापले. एकीकडे सरकारने नेमलेल्‍या एका समितीने दिलेल्‍या अहवालात चीनने 640 वर्ग किमी भारतीय जमिन ताब्‍यात घेतल्‍याचा उल्‍लेख करण्‍यात आला आहे. तर, दुसरीकडे संसदेत संरक्षणमंत्री ए. के. एंटोनी यांनी अहवालात असा कोणताही उल्‍लेख नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले. त्‍यामुळे खरे काय, असा सवाल करत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला.

सरकारने श्‍याम सरण समितीच्‍या अहवालाचा हवाला देत चीनच्‍या घुसखोरीची माहिती देणा-या बातम्‍या माध्‍यमांमध्‍ये झळकल्‍या. त्‍यानंतर संसदेत हा मुद्दा उचलण्‍यात आला. भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पार्टीने या मुद्यावर चर्चा करुन संरक्षण मंत्र्यानी उत्तर देण्‍याची मागणी केली. त्‍यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्‍ये चांगली जुंपली. लोकसभेचे काम त्‍यामुळे काही काळासाठी तहकूब करण्‍यात आले होते.

भाजप नेते यशवंत सिन्‍हा म्‍हणाले, श्‍याम सरण यांनी अहवालात चीनने प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषा पार करुन 640 वर्ग किमी भारतीय जमिन बळकावल्‍याचा उल्‍लेख केला आहे. माध्‍यमांमध्‍ये अशा बातम्‍या दाखविण्‍यात येत असून संसदेला याबाबत माहिती नाही आणि सरकार गप्‍प आहे. यावर संरक्षण मंत्र्यांनी तत्‍काळ निवेदन द्यावे, अशी मागणीही सिन्‍हा यांनी केली. परंतु, एंटोनी यांनी अहवालात असा उल्‍लेख असल्‍याचे फेटाळले. स्‍वतः सरण यांनीही असा उल्‍लेन नसल्‍याचे सांगितले.