नवी दिल्ली- सियाचीनमधील हिमवादळात 35 फूटांच्या बर्फातून 6 दिवसानंतर जिवंत बाहेर काढण्यात आलेला लान्स नायक हनुमंतप्पाची प्रकृती चिंताजनक आहे. हनुमंतप्पा कोमात गेला असून पुढील 48 तास त्याच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले होते. मात्र, बुधवारी सायंकाळी त्यांची प्रकृती अधिकही खालावली. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एम्सच्या तज्ज्ञांची एक टीम आर्मी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आली आहे.
दिल्लीतील आर्मी रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये हनुमंतप्पावर उपचार सुरु आहेत. त्याला व्हॅंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्याच्या लिव्हर व किडनीचे कार्य बंद झाले आहे. यासोबत त्याला निमोनिया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
जांबाज जवान हनुमंतप्पाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी वाराणसीतील गंगा घाट येथे विशेष प्रार्थना करण्यात येत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही मृत्युशी झुंज देणाऱ्या हनुमंतप्पाच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. यासोबतच त्याने सियाचिनमधील हिमस्खलनात शहीद झालेल्या जवानांना सलाम केला आहे. सचिनने टि्वटरवर 'ट्वीट' करून आपली भावना व्यक्त केली आहे. याशिवाय हनुमंतप्पाच्या प्रकृत्ती लवकर सुधारणा व्हावी म्हणून वाराणसीतील गंगा घाट येथे विशेष प्रार्थना करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर व लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी मंगळवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन हनुमंतप्पाच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. हनुमंतप्पाचे कुटुंबिय देखील दिल्ली पोहोचले आहेत.
दरम्यान, सियाचीनमधील तब्बल 19,600 फुटांवरील सोनम चौकीवर गस्तीवर असलेले मद्रास रेजिमेंटचे 10 जवान 3 फेब्रुवारीला हिमवादळात अडकले होते. सर्व बर्फाखाली दबले गेले होते. सर्वच शहीद झाल्याचे आधी मानण्यात आले होते. मात्र, लष्कराने जवानांचा शोध आणि सज्जता काय ठेवली होती. कारण, कुणीतरी जिवंत सापडेल, अशी आशा बचाव पथकाला वाटत होती.
पुढील स्लाइडवर वाचा, हनुमंतप्पासाठी किडनी देण्याची या महिलेने दर्शवली तयारी...