आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Siachen Rescue Operation Went On With 150 Soldiers For Six Days

सहा दिवस बर्फात होते हनुमंतप्पा, कसे राहिले जिवंत, कसा मिळवला प्राणवायू?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्फ कापून त्याखाली दबलेल्या जवानांचा शोध घेण्यात आला. - Divya Marathi
बर्फ कापून त्याखाली दबलेल्या जवानांचा शोध घेण्यात आला.
नवी दिल्ली - सियाचीनमधील तब्बल १९,६०० फुटांवरील सोनम चौकी. ३ फेब्रुवारीला मद्रास रेजिमेंटचे १० जवान गस्तीवर असताना हिमवादळात अडकले. बर्फाखाली दबले गेल्याने सर्वच शहीद झाले, असे मानण्यात आले. मात्र, लष्कराने जवानांचा शोध आणि सज्जताही ठेवली. कारण, कुणीतरी जिवंत सापडेल अशी आशा बचाव पथकाला वाटत होती.

या घटनेला १२५ तास उलटले होते. काही ठिकाणी ४५ फुटांपर्यंत बर्फ खोदण्यात आला होता. काहीच संकेत मिळत नव्हते. मात्र, एक श्वान (स्निफर डॉग) वारंवार विशिष्ट ठिकाणी घुटमळत होेते. सोमवारी पथकाने येथे खोदकाम सुरू केले. त्यात लान्सनायक हनुमंतप्पा हा जवान जिवंत आढळला. बाहेर काढले तेव्हा तो शुद्धीवर होता. मात्र, अशक्त, शांत झाेपल्यासारखा वाटत होता. शरीरातील पाणी कमी झाले होते. पाच दिवसांपासून अन्नाचा कण नव्हता. याशिवाय गोठवणाऱ्या थंडीमुळे हायपोथर्मिया झाला होता. हनुमंतप्पाला तत्काळ ऑक्सिजन देण्यात आला. उबदार तंबूत ठेवण्यात आले. सोमवारची रात्र तिथेच गेली. एका अधिकाऱ्याने सांगितले, ज्या भागात हनुमंत दबला गेला तिथे एक वायुगोल (एअर बबल) तयार झाला होता. त्यातूनच त्याला ऑक्सिजन मिळत होता. त्यावर तंबूचा एक तुकडाही उडून आला होता. त्यामुळे बर्फाशी त्याचा थेट संपर्कही झाला नव्हता. हनुमंतप्पाची प्रकृती चिंताजनक होती. मंगळवारी सकाळी डॉक्टराच्या पथकाने त्याला सियाचीन बेस कँपवर नेले. नंतर थॉईस विमानतळावरून थेट दिल्लीत आणण्यात आले. सध्या लष्करी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हनुमंतप्पाची शुद्ध हरपल्यामुळे तो कोमात आहे. त्याचे यकृत व किडनीवरही परिणाम झाला आहे. बर्फाच्या महाकाय थराखाली दबूनही हनुमंतप्पाला शरीरावर खरचटलेसुद्धा नाही. सध्या त्याला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, आई म्हणाली, मुलाने स्वप्नात येऊन म्हटले होते, परत येईनच