आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांबळीने सोशल मीडियावरुन टिप्पणी केल्यानंतर सिद्धू सर्वसामान्यांच्याही निशाण्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी कसोटीपटू नवज्योतसिंग सिद्धू त्यांच्या कॉमेंट्री स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले आहेत. भास्कर समुहाच्या dainikbhaskar.com या वेबसाइटवरील 'अपने TWITTER अकाउंट से सिद्धू को गालियां पोस्‍ट होने पर कांबली ने मांगी माफी' या बातमीवर वाचकांकडून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. वाचकांनी भाजप नेते आणि माजी खासदार सिद्धूच्या कॉमेंट्रीवर (समालोचन) टीका केली आहे. ट्विटर आणि फेसबुक सारख्या सोशल साइट्सवर सिद्धू विनोदी पात्र ठरत आहे.
dainikbhaskar.com वाचकांच्या प्रतिक्रिया
प्राची लिहितात, 'सिद्धूची कॉमेंट्री स्टाइल फार त्रासदाक आहे.' प्राचीने कांबळीचे कौतूक करत म्हटले आहे, माझी तुम्हाला विनंती राहिल की सिद्धूला कॉमेंट्री बॉक्समधून बाहेर काढा. योगेंद्र सिंह लिहितात, 'कळत नाही अशा व्यक्तीला कॉमेंट्रीसाठी कशासाठी बसवले जाते.' प्रविण लिहितात, 'मॅच दरम्यान सिद्धू कॉमेंट्री कमी आणि शेर-ओ-शायरी जास्त करतो. त्याला आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकले पाहिजे. मी तर माझ्या टीव्हीचा आवाज बंद करुन फक्त मॅच पाहातो. प्लीज, प्लीज, प्लीज. आपल्या माध्यामातून माझी विनंती आहे, की सिद्धूची कॉमेंट्री बंद करा. नाहीतर आयपीएल पाहाणाऱ्यांची संख्या लवकरच कमी होईल.'
ट्विटरवर अशा आल्या प्रतिक्रिया
'नवज्योतसिंग सिद्धू सहनशक्तीच्या पलिकडे आहे. सोनी मॅक्स त्यांच्या व्हर्बल डायरियाची लागण आम्हाला का लावत आहे. त्यांनी दुसऱ्या समालोचकांना संधी दिली पाहिजे.'
-Rahul Kanwal ‏@rahulkanwal
'सिद्धूला म्यूट (शांत) करण्यासाठी नवीन रिमोट बाजारात आले आहे.'
-Abhijeet Jha ‏@DarrKeAage

कॉमेंट्रीत क्रिकेट कमी आणि कथा व शायरीच जास्त
माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धूने कॉमेंट्री सुरु केल्यानंतर त्याने त्याची स्वतःची वेगळी शैली तयार केली. तो कॉमेंट्री करत असताना त्यात चुटकुले, किस्से, कवितांच्या ओळी आणि शायरी एकवतो. मैदानात खेळत असलेल्या क्रिकेटर्सना अनेक उपमा देतो. कॉमेंट्रीची त्याची ही नवी शैली होती. यामुळे तो लवकरच लोकप्रिय देखील झाला. त्यानंतर त्याला कॉमेडी शोमध्ये देखील बोलावण्यात येऊ लागले. आयपीएलच्या प्रत्येक पर्वांमध्ये त्याने त्याची ही शैली अधिक विकसीत करत नेली. मात्र आता लोकांना त्याच्या शेर-ओ-शायरीची उबग आली असे त्यांच्या प्रतिक्रियावरून दिसत आहे. त्यामुळे लोक आता त्यांच्या कॉमेंट्रीवर टीप्पणी करु लागले आहेत.