आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Signalling That Congress Is Ready For The Battle Ahead In The Lok Sabha Elections

राहुल गांधींच्या कार्यशैलीने पक्षात नवचैतन्य - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे सोनिया गांधी यांनी उदघाटन केल्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्ष विजयी होईल, असा विश्वास डॉ. सिंग यांनी व्यक्त केला.

सोनिया गांधी यांच्या भाषणावेळी ज्या प्रमाणे तालकटोरा स्टेडियममध्ये उपस्थित कार्यकर्त्यांनी राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा आणि त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची मागणी केली, त्याचप्रमाणे मनमोहनसिंग यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
डॉ. सिंग म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्ष लोकसभेत विजयी होईल. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने पक्षात चैतन्य निर्माण झाले आहे.