आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-जपान ‘टू-प्लस-टू सिक्युरिटी’वर करणार स्वाक्षरी; युद्धावेळी एकमेकांना करणार मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जपानी माध्यमांनुसार पंतप्रधान शिंजो आबे यांचा भारत दौरा खूप महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांत व्यूहात्मक आणि कूटनीतिक असे मोठे करार होऊ शकतात. जपानी माध्यमांनुसार, भारताशी टू-प्लस-टू सिक्युरिटी करारावर शिक्कामोर्तब होईल, याबाबत शिंजो अॅबे आश्वस्त आहेत. जपानने २०१४ मध्ये हा प्रस्ताव भारतासमोर मांडला होता. भारताला चीनला नाराज करायचे नव्हते, म्हणून तो अमलात आला नाही. सध्याची वेळ योग्य आहे. डोकलाम वादामुळे भारत आणि चीनमध्ये युद्धसदृश स्थिती झाली होती. विभागीय समुद्रांत चीनच्या आक्रमकतेवरही चर्चा होईल.  
 
हा दाैरा चीनची अाक्रमकता राेखेल : जपानी प्रसारमाध्यमे

द मइनिची (जपान) : चीनची अाक्रमकता राेखण्यासाठी करार
क्षेत्रीय समुद्रांमध्ये चीनच्या वाढत्या अाक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर दाेन्ही देश संरक्षणासंबंधीच्या अनेक समझाेत्यांवर सहमती दर्शवू शकतात. तसेच शिंजाे अॅबे हे भारतात संरक्षण उपकरणांबाबत माेठे समझाेते करू शकतात व सैन्याभ्यासावरही करार हाेऊ शकताे. शिंकानसेन प्रकल्पाबाबतही इच्छा अाहे, असे अॅबे यांनी टाेकियाेत म्हटले हाेते. तो भारत व जपानच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड सिद्ध हाेईल.  

(जपान) : अण्वस्त्रे व तंत्रज्ञानही भारताला देऊ शकतात अॅबे
‘टू-प्लस-टू सिक्युरिटी’वर माेदी सहमत असण्याबाबत अॅबेंना विश्वास अाहे. चीन नाराज हाेऊ नये यासाठी भारत हा करार करत नव्हता; परंतु अाता हा करार करण्यासाठी अत्यंत याेग्य वेळ अाहे. तसेच अॅबे हे भारताला अण्वस्त्रे व त्यांचे तंत्रज्ञान देण्याच्या विषयावर चर्चा करण्याची शक्यता अाहे. दाेन्ही देशांत सिव्हिल न्यूक्लिअरबाबत सहमती अाहे. दाेन्ही देश समुद्रमार्गे वाहतुकीच्या दिशेने पुढे जाईल. 

क्याेडाे न्यूज (जपान) : अॅबे उपस्थित करणार काेरियाचा मुद्दा
याबाबत सरकारी सूत्रांचे म्हणणे अाहे की, शिंजाे हे या दाैऱ्यात एशिया पॅसिफिक व हिंद महासागरात चीनचा वाढता हस्तक्षेप व प्रभावाचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता अाहे. या अंतर्गत दाेन्ही देशांदरम्यान सैन्य युद्धाभ्यासाचा विस्तारही हाेऊ शकताे. तसेच ते माेदींसमाेर काेरियाचा मुद्दादेखील मांडू शकतात. या दाैऱ्यात माेदींसाेबत सर्व जगाला उत्तर काेरियावर प्रतिबंध लावण्याचे अावाहन करेन, असे अॅबे यांनी म्हटले होते. 

- ‘टू-प्लस-टू सिक्युरिटी’ : हा दाेन देशांमध्ये युद्धावेळी एकमेकांना काेणत्याही स्थितीत मदत करण्याचा समझाेता अाहे. अन्य तिसऱ्या देशाने यापैकी एका देशावर हल्ला केल्यास दुसरा देश सैन्याची मदत करेल. तसेच एकमेकांच्या भूमीचाही वापर करू शकतील. भारताचा काेणत्याही देशाशी असा समझाेता झालेला नाही. 

अाशियात चीनचा प्रभाव कमी करण्याची भारत-जपानची इच्छा  
ग्लोबल टाइम्स (चीन)
: चीनला रोखण्यासाठी आशिया-आफ्रिका कॉरिडाॅर करताहेत दोन्ही देश  
मोदींनी जपानसमोर आशिया-आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉरचा प्रस्ताव मांडला आहे. चीनच्या वन बेल्ट वन रोडला पर्याय म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. आशिया, प्रशांत महासागराच्या देशांना आफ्रिकेशी जोडता यावे म्हणून भारत आणि जपानला नवा सागरी मार्ग तयार करण्याची इच्छा आहे. तेथे पायाभूत प्रकल्पांत गुंतवणूक करण्याचा हेतू आहे. त्यामुळे चीनने गांभीर्याने विचार करावा. 

स्पुतनिक (रशिया) : अॅबे-मोदी ४० अब्ज डॉलरचा आशिया-आफ्रिका कॉरिडॉर प्रकल्प सुरू करतील  भारत आणि जपान आशिया-आफ्रिका देशांत गुंतवणूक वाढवण्यासाठी आशिया-आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर लाँच करू शकतात. त्यात जपान ३० अब्ज डॉलर आणि भारत १० अब्ज डॉलर गुंतवणूक करण्यास राजी आहेत. चीनच्या ओबीओआर प्रकल्पाला पर्याय म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. मोदींनी शिष्टाचार मोडून आबेंचे स्वागत केले आहे. 

बीबीसी (यूके) : जपानी पीएमचे भव्य स्वागत, मोदींनी अॅबेंना मशिदीतही नेले
जपानी पीएम शिंजो अॅबे यांना भारतात पोहोचल्यानंतर विमानतळावर मानवंदना देण्यात आली. नंतर त्यांचे पारंपरिक स्वागत झाले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर हजर होते. मोदोंनी अॅबेंसोबत साबरमती आश्रमापर्यंत रोड शो केला. त्यांनी अॅबेंना सीदी सैयद मशिदीतही नेले. दोन्ही नेते गुरुवारी अहमदाबाद-मुंबई दरम्यान भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजनही करतील.
बातम्या आणखी आहेत...