नवी दिल्ली - अमिताभ बच्चन यांना ‘अतुल्य भारत’चे ब्रँड अॅम्बेसेडर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने तूर्तास लांबणीवर टाकला आहे. पनामा पेपर्स प्रकरणात अमिताभ यांचे नाव समोर आले होते. त्याचा तपास पूर्ण होईपर्यंत निर्णय होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
अभिनता आमिर खान आधी ‘अतुल्य भारत’चा ब्रँड अॅम्बेसेडर होता. पर्यटन मंत्रालयाने त्याच्या जागी अमिताभ बच्चन व प्रियंका चाेप्राला ब्रँड अॅम्बेसेडर करण्याचा निर्णय घेतला होता. पनामा पेपर लीक प्रकरणात अमिताभ व त्यांची सून ऐश्वर्या यांची नावे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आपली अवैध संपत्ती लपवणाऱ्यांच्या यादी आली होती. तथापि, दोघांनीही त्याचे खंडन केले होते. आता वादापासून वाचण्यासाठी सरकार तपास समितीच्या अहवालाची प्रतीक्षा करणार आहे.
काय आहे पनामा पेपर्स? 600 डीव्हीडीएवढा डेटा, 1.15 कोटी दस्तऐवज
पनामा पेपर्स नावाने शोधपत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने (आयसीआयजे) पनामा देशातील विधी सल्लागार कंपनी मोसेक फोन्सेकाचे दस्तएेवज सार्वजनिक केले आहेत. 80 देशांमधील 107 मीडिया कंपन्यांमधील 400 पत्रकार या दस्तऐवजांचा अभ्यास करत आहेत. याचा पहिला रिपोर्ट 3 एप्रिल 2016 रोजी जाहीर करण्यात आला. मेच्या सुरवातीपर्यंत जवळपास सर्वच दस्तऐवजांचा अहवाल पब्लिश केला जाणार आहे. पत्रकारांनी तब्बल 2.6 टेराबाइटचे (600 डीव्हीडी) विश्लेषण केले. हा डेटा 1977 ते 2015 पर्यंतच्या 40 वर्षांचा आहे. तपासात 2.14 लाख प्रतिष्ठानांशी संबंधित 1.15 कोटी दस्तऐवजांची झाडाझडती घेण्यात आली.
भारताची ही सर्वात महत्त्वाची नावे
एेश्वर्या रायवर आरोप
ब्रिटिश व्हर्जिन आयलँडमध्ये एक कंपनीची संचालिका/शेअरहोल्डर होती. तिचे पिता, आई,भाऊही 2005 मध्ये स्थापित कंपनी एमिक पार्टनर्स लिमिटेडमध्ये संचालक होते. नंतर ते शेअरहोल्डर झाले. कंपनी 2008 मध्ये बंद.
एेश्वर्याचे उत्तर : जे दस्तऐवज सांगितले जात आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत.
अमिताभ बच्चनवर आरोप
चारशिपिंग कंपन्यांचे संचालक. एक ब्रिटिश व्हर्जिन आयलँडची तीन बहामाच्या. कंपन्या 1993 च्या. त्यांचे अधिकृत भांडवल तेे 50 हजार डॉलर होते. कंपनीने लाखो डॉलर्सच्या जहाजांचा व्यवसाय केला.
अमिताभचे उत्तर : जारीदस्तऐवजांत तथ्य नाही. (निवेदन जारी करून)