आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sikkim Standoff China Issues Safety Advisory For Its Citizens Travelling To India

भारतासोबतच्या वादामुळे ड्रॅगनने आपल्या नागरिकांसाठी जारी केल्या खबरदारीच्या सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सिक्कीम बॉर्डरवर जवळजवळ एक महिन्यापासून असलेल्या तणावामुळे चीनने भारतात राहणाऱ्या वा पर्यटनासाठी आलेल्या आपल्या नागरिकांसाठी खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत. यात म्हटले आहे की, भारतात आपल्या सुरक्षेसाठी सतर्क राहा आणि अनावश्यक प्रवास टाळा. तथापि, चीन भूतान आणि सिक्कीम सीमेवर एक रोड बनवू इच्छितो. याचा भारत आणि भूतानने विरोध केल्यापासून दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आहेत.
 
सूचनांमध्ये आणखी काय सांगितले...
वृत्तसंस्थेशी चर्चेदरम्यान चिनी सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतात आमच्या दूतावासाने आमच्या नागरिकांसाठी खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत. यात त्यांना भारतात आपल्या सुरक्षेबाबत दक्ष राहण्याच्या तसेच अनावश्यक प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- या सूचना 7 जुलै रोजी जारी करण्यात आल्या होत्या आणि महिनाभर लक्षात ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. या सूचना जारी करण्याचे कारण स्पष्ट नाही. परंतु, दोन्ही देशांमध्ये असलेला सध्याचा तणाव हेच मुख्य कारण असल्याचे स्पष्ट होते.
बातम्या आणखी आहेत...