आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळा पैसा असणाऱ्यांना माफी नाहीच, गृहिणींनी ५०,००० पर्यंतची बचत बिनदिक्कत बँकेत जमा करावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१००० - ५०० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर अद्यापही काही प्रश्न लोकांच्या मनात घोळत आहेत. सर्वात महत्त्वाचे प्रश्न गृहिणींना पडले आहेत. त्यांनी बचतीच्या माध्यमातून ३०-४० हजार रुपये शिलकीत ठेवले होते,त्याचे आता काय होणार? ज्यांनी १०-२० लाख रुपये दडपून ठेवले होते,ते काय करतील? जे लोक बँकेत नोटा बदलायला जातील त्यांची अकारण चौकशी तर होणार नाही? ‘भास्कर’चे वार्ताहर संतोष ठाकूर यांनी सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून जाणून घेतली.
 
 
शनिवार- रविवारीही बँका सुरू राहणार
सामान्यांसाठी ही चांगली बातमी . शनिवार व रविवारी बँका सुरू राहतील, असा सरकारने निर्णय घेतला आहे. १४ रोजी गुरुनानक जयंतीच्या सुटीनंतर १५ नोव्हेंबरपासून बँकेची वेळ सामान्य. अनेक बँकांनी वेळ वाढवली असून एटीएम शुल्क रद्द करून क्रेडिट लिमिट वाढवली. एसबीआय आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील. नोट बदलण्यासाठी एक्स्ट्रा एक्स्चेंज काउंटर लागतील. आयसीआयसीआय बँक रात्री ८.०० पर्यंत सुरू राहील. बँकेने डेबिट कार्डाची मर्यादा दुप्पट केली.
 

पुढील स्लाईडवर वाचा, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे 
बातम्या आणखी आहेत...