आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singer Mika Singh Slapped Doctor In A Event In Delhi News In Marathi

VIDEO: सिंगर मिकाने \'मीडिल फिंगर\' दिखवणार्‍या डॉक्टरच्या मारली थोबाडीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ‍प्रसिद्ध सिंगर मिका सिंग एका घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिल्लीतील एका लाइव्ह इव्हेंटमध्ये मिकाने मिडिल फिगर दाखवून अश्लील हावभाव करणार्‍या डॉक्टरच्या थोबाडीत मारली. दिल्लीतील आफ्थॅल्मालॉजी सोसायटीतर्फे आयोजित एका कार्यक्रमात शनिवारी (11 एप्रिल) रात्री ही घटना घडली. या प्रकरणी मिका विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, दिल्ली आफ्थॅल्मालॉजी सोसायटीतर्फे आयोजित एका कार्यक्रमात मिकाने 'तू मेरा हीरो', 'सावन में लग गई आग', आणि 'जुम्मे की रात' आदी गीत सादर केले. मिकाने दिल्लीसह दिल्लीतील डॉक्टरांची भरभरून प्रशंसाही केली. कार्यक्रमाला तूफान गर्दी होती. त्यामुळे मिकाने पुरुषांना स्टेजच्या दोन्ही बाजुला आणि महिलांना मध्य भागात उभे राहाण्याचे आवाहन केले.

कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असताना अचानक म्युझिक बंद झाले आणि मिकाच्या बाउंसरला गर्दीतील एका डॉक्टरला स्टेजवर आणले. डॉक्टर स्टेजवर आल्यानंतर मिकाने त्याचा कान गरम केला. हे पाहून सगळ्यांना धक्का बसला.

संबंधित डॉक्टरला समज देऊनही तो महिलांमध्ये नाचत होता. डॉक्टर आपली मिडिल फिंगर दाखवून चेहर्‍यावर अश्लील हावभाव करत असल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

व्हिडिओ आला समोर...
या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला असून मिका हा डॉक्टरच्या थोबाडीत मारताना दिसत आहे. 'तुझ्या आई-बहिणीसोबतही असेच करशील का?' अशा भाषेत मिकाने संबंधित डॉक्टरला खडसावले. तसेच म‍िकाच्या बाउंसरनी त्याला बाहेर काढले. परंतु, मिकाने डॉक्टरच्या थोबाडीत मारल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर्स मिका आणि बाउंसरसोबत हुज्जत घातली. संतापलेल्या डॉक्टरांनी मिकाच्या म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्सची तोडफोड केली. मात्र, पोलिसांनी मिकावर कारवाई करण्‍याचे आश्वासन दिल्यानंतर जमावाने मिकाला सोडले.

डॉक्टरच्या कानाच्या पडद्याला गंभीर दुखापत...
मिकाने थोबाडीत मारलेल्या डॉक्टरच्या कानाच्या पडद्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. दिल्ली आफ्थॅल्मालॉजी सोसायटीचे सचिव राजेश सिन्हा हे प्रकरण फारच गंभीर आहे. यापुढे डॉक्टरांवरील मारहाण कदापी सहन केली जाणार नाही.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, व्हिडिओ आणि संबंधित फोटो...