आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटमधील काळा पैसा थांबवा : एसआयटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काळ्या पैशावर सुप्रीम कोर्टाने तयार केलेल्या एसआयटीने शुक्रवारी तिसऱ्या अहवालात करण्यात आलेल्या शिफारशी जाहीर केल्या आहेत. अहवालात एसआयटीने शेअर बाजारात अवैधरीत्या पैसा गुंतवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईसाठी व्यवस्था बनवणे आणि क्रिकेटमधील वाढता सट्टाबाजार आणि मोठ्या प्रमाणात लागणारा काळा पैसा थांबवण्यासाठी उपाय सुचवण्यात आले आहेत. एसआयटीने शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांना मिळणाऱ्या डोनेशनवर नजर ठेवण्यासाठी अशा संस्थांनी चेकच्या माध्यमातूनच पैसा स्वीकारावा, अशी शिफारस केली आहे. तसेच सेबीलादेखील काळा पैसा थांबवण्यासाठी कडक नियम बनवण्याचा सल्ला दिला आहे.