आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळा पैसा : व्हिसल ब्लोअरचा नुसताच गोंधळ, एसआयटीचे आरोपावर प्रश्नचिन्हं

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचे अध्यक्ष न्या. एम.बी. शहा यांनी एचएसबीसी बँकेचे व्हिसल ब्लोअर हर्वे फल्सियानी यांचा आरोप चुकीचा ठरवला आहे. ते म्हणाले की, फल्सियानी नुसताच गोंधळ घालत आहेत. आम्ही सुरुवातीस मागितलेल्या माहितीचे त्यांनी अद्याप उत्तर दिले नाही. भारतीय संस्था सहकार्य करत नसल्याचा त्यांचा आरोपही चुकीचा आहे.

न्या. शहा म्हणाले, भारत फल्सियानी आणि अन्य व्हिसल ब्लोअर्सना पूर्ण सहकार्य देण्यास तयार आहे. मात्र, त्याआधी त्यांनी विदेशात काळा पैसा दडवणाऱ्यांची नावे तरी द्यावीत. सीबीडीटीने त्यांच्याकडे माहिती मागितली हाेती. मात्र,इ त्यांनी उत्तर दिले नाही. आम्ही अद्यापही प्रतीक्षा करत आहोत. फल्सियानी आम्हाला, सरकारला किंवा एखाद्या पत्रकाराला माहिती देऊ शकतात.एचएसबीसी बँकेचे माजी कर्मचारी फल्सियानी यांनी सोमवारी म्हटले होते की, भारतातून अद्यापही कोट्यवधी रुपये काळा पैसा विदेशात जात आहे. भारतीय संस्थांकडे बरीच माहिती आहे. मात्र, ते त्यावर काम करत नाहीत. त्यांनी तपासकामात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र, यासोबत सुरक्षेचीही मागणी केली. भारतात आलो तर मला अटक होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

फल्सियानी यांच्यावर स्वित्झर्लंडमध्ये बँक खातेदारांची माहिती लीक केल्याचा खटला चालू आहे. ही खाती एचएसबीसी बँकेच्या जीनिव्हा शाखेतील होती. खातेदारांची ही यादी फ्रान्स सरकारच्या हाती लागली होती. त्यांनी यासंबंधातील माहिती भारताला दिली.

फल्सियानी यांना पुरस्काराचीही ऑफर
अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, फल्सियानी यांनी कोणत्याही अटीशिवाय माहिती दिली पाहिजे. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली आहे. माहितीच्या बदल्यात त्यांना पुरस्काराची ऑफर दिली आहे. सरकार काळ्या पैशाची माहिती प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे. वर्षभरात जेवढी कारवाई करण्यात आली, तेवढी ती त्याआधी झाली नव्हती.

२० पेक्षा जास्त कंपन्यांत संचालक
एसआयटीने मंगळवारी तिसरा अहवाल दिला. यात विशेषत: बनावट कंपन्यांच्या आडून मनी लाँडरिंगवर प्रकाश टाकण्यात आला आहे. केवळ आर्थिक देवाण-घेवाण करणाऱ्या कंपनीला शेल कंपनी म्हटले जाते. अहवालानुसार, २,६२७ नागरिक २० पेक्षा जास्त कंपन्यांत संचालक आहेत. हे कंपनी कायदा २०१३ चे उल्लंघन आहे. कायद्यानुसार एक व्यक्ती २० कंपन्यांमध्ये संचालक होऊ शकते.

कंपन्या अनेक, पत्ता एक
एका पत्त्यावरून अनेक कंपन्यांचे कामकाज केले जात असल्याचेही एसआयटीने म्हटले आहे. कायदेशीरदृष्ट्या ते चुकीचे नाही. मात्र, सीबीडीटी, सीबीईसी, ईडी अशा कंपन्यांची चौकशी करावी, असे एसआयटीला वाटते. या शेल कंपन्या असू शकतात. अनेक शेल कंपन्यांमध्ये चालक आणि आचाऱ्यांना संचालक दाखवले आहे.
बातम्या आणखी आहेत...