आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- संसदेवर 2001 मध्ये आणि मुंबईत करण्यात आलेला 26/11 च्या हल्ल्यांमागे तत्कालीन केंद्र सरकारचाच हात होता, असा खळबळजनक आरोप इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणातील एका तपास अधिका-याने केला होता. ही माहिती गृह खात्याचे तत्कालीन अवर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनी उघड केली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात दिलेल्या वृत्तामध्ये हा दावा करण्यात आला आहे. मणी यांनी न्यायालयात एक शपथपत्र सादर केले. त्यात त्यांनी हा खळबळजनक उल्लेख केला आहे. सीबीआय-एसआयटीच्या तपास पथकातील सतीश वर्मा या अधिका-याने ही माहिती दिल्याचे मणी यांनी शपथपत्रात म्हटले आहे. वर्मा हे गुजरातचे आयपीएस अधिकारी आहेत. मणी यांनी सांगितले, की वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार13 डिसेंबर 2001 ला संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला पोटा कायद्याला (दहशतवाद प्रतिबंधक कायदा) बळकटी देण्यासाठी घडवून आणण्यात आला, तर 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागेही सरकारचे कारस्थान होते. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यात (यूएपीए) महत्वाचे बदल करण्यासाठी हा हल्ला घडविण्यात आला होता.
मणी हे सध्या केंद्रीय नगरविकास मंत्रालयात भूमी व विकास उपअधिकारी आहेत. त्यांनी वर्मा यांच्यावर काही आरोप केले आहेत. मणी यांनी आपल्या वरीष्ठांना याबाबत पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी हे आरोप केले आहेत. वर्मा यांची भाषा पाकिस्तानी गुप्तचर संघटना 'आयएसआय'च्या अधिका-यासारखीच असल्याचे मणी यांनी सांगितले. तसेच वर्मा यांनी आपल्याला 22 जूनला गांधीनगरमध्ये चौकशीदरम्यान ही बाब सांगितली होती. याशिवाय वर्मा यांनी एका जबाबावर स्वाक्षरी करण्यासाठी माझ्यावर दबाव आणल्याचाही आरोप मणी यांनी केला आहे. परंतु, मी त्या दबावाला बळी पडलो नाही, असे मणी यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.