आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिट ब्युरोचा माझा राजीनामा? नॉनसेन्स!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यामुळे पॉलिट ब्युरोतील सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचा दावा म्हणजे नॉनसेन्स (मूर्खपणा) आहे. पक्षाच्या अंतर्गत गोष्टींबद्दल मी बाहेर कधीही चर्चा करत नाही, असे माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.

अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माकपला केवळ नऊ खासदारांवर समाधान मानण्याची वेळ आली आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाचे 16 खासदार होते. त्यामुळेच पराभवाची जबाबदारी स्वीकारून येचुरी पॉलिट ब्युरोच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळासह मीडियात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर येचुरी यांनी यासंदर्भातील दाव्याचा समाचार घेतला.

पक्षात अनेक चांगले आणि हुशार लोक आहेत. तरुण तसेच महिलांचाही यात समावेश आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच त्यांच्याकडे महत्त्वाची सूत्रे सोपवली जाऊ शकतात. दरम्यान, पॉलिट ब्युरोची बैठक 6 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 7 व 8 जून रोजी केंद्रीय समितीच्या बैठकीत संघटनात्मक प्रश्नांची चर्चा केली जाणार आहे.

राज्यसभेचा दावा काल्पनिक : जदयू
बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दिल्ली मुक्कामी पाठवण्यात येणार असून त्यांना राज्यसभा सदस्यत्व देण्यात येईल, अशा बातम्या सपशेल काल्पनिक आहेत, असे जनता दल युनायटेडचे अध्यक्ष वसिष्ठ नारायणसिंह यांनी शनिवारी स्पष्ट केले. ते कशाला राज्यसभेवर जातील? उलट 2015 मधील विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा लोकांना सामोरे जाणार आहेत, असे सिंह म्हणाले.