आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादसह सहा शहरे बनणार सोलार सिटी, राज्य-खासगी कंपनीत करार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत राज्यात सहा सौर शहरे (सोलार सिटी) उभारण्याची तयारी केली आहे. यामध्ये नागपूर, औरंगाबाद, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नांदेड आणि शिर्डी येथे सौर प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये देशात ५५ सौर शहरे विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या शहरात सौरऊर्जा उत्पादनाची क्षमता ७,००० मेगावॅटपर्यंत असणार आहे.

महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत राज्यात सहा सौर शहरे (सोलार सिटी) उभारण्याची तयारी केली आहे. यामध्ये नागपूर, औरंगाबाद, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नांदेड आण शिर्डी येथे सौर प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये देशात ५५ सौर शहरे विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या शहरात सौरऊर्जा उत्पादनाची क्षमता ७,००० मेगावॅटपर्यंत असणार आहे, ज्यासाठी खासगी कंपनीसोबत राज्य सरकार करार करणार आहे.

राज्य सरकारच्या वतीने विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या माध्यमातून १४,४०० मेगावॅट वाढीव वीजनिर्मितीची घोषणा केली आहे. यामध्ये ७,५०० मेगावॅट वीज सौरऊर्जेच्या, ५,००० मेगावॅट पवनऊर्जेच्या, तर इतर स्रोतांच्या तसेच औद्योगिक कचऱ्याच्या माध्यमातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. ७,५०० मेगावॅट सौरऊर्जा उत्पादनात ५,००० मेगावॅट ऊर्जा बीओटीवर, तर २,५०० मेगावॅट सार्वजनिक-खासगी सहकार्याने विकसित करण्यात येणार आहे. या सहा शहरांमध्ये महानगरपालिका तांत्रिक आणि निर्माण क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत निर्णय घेणार आहे.

सौरऊर्जा उत्पादनासाठी सरकार बीओटी तत्त्वावर ५,००० मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मितीसाठी खासगी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याकरिता प्रयत्न करणार आहे. वीज लिलावाच्या माध्यमातून विकली जाणार आहे.