आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या कसा झाला "भारतमाता की जय'चा उदय, हे आहे पहिले चित्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९०५ मध्ये अबनींद्रनाथ टागोर यांनी भारतमातेचे चित्र रेखाटले. - Divya Marathi
१९०५ मध्ये अबनींद्रनाथ टागोर यांनी भारतमातेचे चित्र रेखाटले.
"भारतमाता की जय'च्या घोषणाबाजीवरून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. ही स्फूर्ती देणारी घोषणा नेमकी आली कुठून याची माहिती घेऊया. सहा मुद्द्यांमधून.

#1 पहिल्यांदा १८७३ मध्ये आले होते नाटक
बंगालचे लेखक किरणचंद्र बंदोपाध्याय यांच्या "भारत माता' नाटकात सर्वप्रथम हे दोन शब्द आले होते. नाटकाचा प्रयोग १८७३ मध्ये झाला. बंगालच्या दुष्काळावर ते बेतले होते. घर सोडून जाणारी महिला आणि तिच्या पतीला एक पुजारी भारतमातेच्या मंदिरात आश्रय देतो. पती-पत्नी इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात क्रांतिकारकांमध्ये सहभागी होतात. यानंतर १८८२ मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची "आनंदमठ' ही कादंबरी आली. यात "वंदे मातरम' स्तोत्र होते.
#2 अबनींद्रनाथ टागोरांनी रेखाटले पहिले चित्र
यानंतर १९०५ मध्ये अबनींद्रनाथ टागोर यांनी भारतमातेचे एक चित्र रेखाटले. यालाच भारतमातेचे पहिले चित्र मानले जाते. चित्रात भारताचा नकाशा नव्हता. भारतमाता भगव्या रंगात बंगालच्या पारंपरिक वेशात दाखवण्यात आली. सुरुवातीस त्यास बंगमाताही संबोधले गेले. ४ हात असलेल्या देवीच्या हातात पुस्तक, कणीस, हार आणि शुभ्र वस्त्र होते.
पुढील स्लाइडमध्ये, भारतमाता की जय'चा उद्या कसा झाला याबद्दलेचे आणखी काही मुद्दे