आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतीपदासाठी पती-पत्नीसमवेत 6 जणांनी दाखल केले अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 28 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 28 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. (संग्रहित फोटो)
नवी दिल्ली- राष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी सुरु झाली. आतापर्यंत 6 जणांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यात मुंबईतील एका दाम्पत्याचा समावेश आहे. ज्यांनी अर्ज दाखल केलेत त्या सर्वांचे अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे. या अर्जासोबत 100 इलेक्टर्स, 50 प्रपोजर्स आणि अप्रूवल्सची गरज असते ते नसल्याने हे अर्ज बाद होतील. राष्ट्रपतीपदासाठी 28 जूनपर्यत अर्ज दाखल करता येणार आहेत. 29 जून रोजी या अर्जांची छाननी होईल. 17 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल. 20 जुलै रोजी मतदान होईल. 

या सहा लोकांनी दाखल केलेत अर्ज
 
1) के पद्मराजन- तामिळनाडू
2) आनंद सिंह कुशवाहा - मध्य प्रदेश
3) ए. बालाराज- तेलंगणा
4) सायरा बानो मोहम्मद पटेल- मुंबई
5) मोहम्मद पटेल अब्दुल हमीद- मुंबई
6) कोंडेकर विजयप्रकाश- पुणे
बातम्या आणखी आहेत...