आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन मुलांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वायव्य दिल्लीतील स्वरूपनगर भागात सहा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याला दुजोरा मिळाल्यानंतर पोलिसांनी कलम ३७६ आणि पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून दोन मुलांना अटक केली आहे. बलात्कार करणारे दोन्ही आरोपी अल्पवयीन असून एकाचे वय १४ वर्षे तर दुसऱ्याचे १६ वर्षे आहे. पोलिसांनी दोघांनाही बाल न्यायालयात हजर करून बाल सुधारगृहात पाठवले आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पीडित मुलगी स्वरूपनगर भागात आपल्या कुुटुंबीयांसह भाड्याच्या घरात राहते. बलात्कार करणाऱ्या आरोपींपैकी एक जण घर मालकाचा मुलगा आहे, तर दुसरा आरोपी तेथेच राहणाऱ्या दुसऱ्या भाडेकरूचा मुलगा आहे. १३ सप्टेंबरला दोन्ही आरोपींनी पीडितेला आपल्यासोबत तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. या धक्क्यामुळे पीडित मुलीने ही घटना कोणालाही सांगितली नाही. तिने रविवारी आईला हे सांगितले. त्यानंतर तक्रार दाखल केली.
बातम्या आणखी आहेत...