आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सियाचीनमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमानाच्या घिरट्या, पाकच्या हवाई दल प्रमुखांनीही केले उड्डाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्‍तानने सियाचीनमध्‍ये आपले सर्व फॉरवर्ड बेस अॅक्टिव्‍ह केले आहेत. - Divya Marathi
पाकिस्‍तानने सियाचीनमध्‍ये आपले सर्व फॉरवर्ड बेस अॅक्टिव्‍ह केले आहेत.
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या लढाऊ विमानाने बुधवारी सियाचीन ग्लेशियरमध्ये घिरट्या घातल्या. पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल सोहेल अमन हे सीमेलगतच्या स्कर्दू येथील हवाई दल तळावर पोहोचले. तेथून त्यांनी मिराज विमानाने उड्डाण घेतले. पाक हवाई दल प्रमुखांनी तेथे पायलट व तांत्रिक कर्मचाऱ्यांशीही चर्चा केली, असे वृत्त एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिले आहे.
 
पाकने सीमेलगतचे सर्व आघाडीचे हवाई दल तळ ऑपरेशनल केल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. सियाचीनमध्ये उड्डाण घेतलेले मिराज विमान याच ऑपरेशनल हवाई दल तळावरून सुरू असलेल्या सरावाचा भाग होते. दुसरीकडे पाकिस्तानी लढाऊ विमानाने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले नाही, असे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे. सियाचीन ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे. काराकोरम रेंजवर ती भारत- पाकिस्तान सीमेवर आहे. शत्रूच्या कारवाईला  असे उत्तर देऊ की ते त्यांच्या कायम स्मरणात ठेवतील. देशाने शत्रूच्या विधानांवर लक्ष देऊ नये, असे अमन यांनी पाकिस्तानी रेडिओला सांगितले.
 
भारतीय चौक्या उडवल्याचा पाकिस्तानचा ‘फर्जिकल’ व्हिडिओ
भारताच्या व्हिडिओला उत्तर म्हणून पाकनेही भारतीय चौक्या स्फोटानेे उडवल्याचा व्हिडिओ जारी केला. ८७ सेकंदांच्या या व्हिडिओत भारतीय चौक्यांवर स्फोट होत असल्याचे दिसतेे. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने फेसबुकवर हा व्हिडिओ पोस्ट केला. भारताने १३ मे राेजी पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य बनवले होते. त्याचे उत्तर म्हणून पाकने  भारतीय चौक्या उडवल्या, असे या व्हिडिओसोबत लिहिले. भारतीय लष्कराच्या अशाच कारवाईचा पाकने इन्कार केला होता आणि दुसऱ्याच दिवशी तसाच व्हिडिओ जारी केला.

पुढील स्‍लाइडवर वाचा, सुखोई विमान कुठे आहे हे माहीत नाही, भारताने सीमेवर तणाव करू नये : चीन
 
बातम्या आणखी आहेत...