आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणाकडेच नाही या मुलाबद्दलची माहिती, आजही VIRAL होत आहे फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटवर 14 लाख वेळा पाहिला गेला हा फोटो - Divya Marathi
इंटरनेटवर 14 लाख वेळा पाहिला गेला हा फोटो
नवी दिल्ली - इंटरनेट जगतात एखादी गोष्ट जर हिट झाली तर तिचा परिणाम फार काळ टिकून राहातो. सध्या फोटो शेअरिंग वेबसाइट्सवर हा फोटो व्हायरल झालेला आहे. प्रत्येक भाषेतील यूजर्स आपापल्या परीने यावर कॅप्शन टाकून फोटो शेअर करत आहेत. कारण, या फोटोतील मुलाच्या चेहऱ्यावरील भाव अतिशय बोलके आणि 'हटके' आहेत. इमगरवर या फोटाला 14 लाख वेळा पाहिले गेले आहेत.
तिसऱ्या जगातील मुलगा
इंटरनेटवर या मुलाला 'तिसऱ्या जगातील संशयी मुलगा' म्हटले जात आहे. या फोटोवर वेगवेगळे कॅप्शन टाकून त्यासोबत विविध भाषा-प्रदेशातील स्थानिक मुद्यांवर भाष्य केले जात आहे. काही म्हणत आहेत - तो विचारतो की तुम्ही मला शाळेत घेऊन जाणार का. कोणी लिहिले की त्याला फिरायला घेऊन जावे यासाठी त्याच्या चेहऱ्यावर असे भाव आहेत. हा खरा फोटो तीन वर्षांपूर्वी रेडिटवर टेक्सासहून अपलोड झाला होता. मात्र, या फोटोतील हा चमत्कारिक भाव असलेला मुलगा कोण, हे अजून कळालेले नाही.

तरुणीची ओळख पटली
या फोटोतील तरुणीची मात्र ओळख पटली आहे. शिकागो येथील 28 वर्षांच्या या तरुणीचे नाव हिना प्रणव आहे. ती डॉक्टर असून 2012 मध्ये मेडिकल स्टूडंट होती. त्यावेळी महिलांसंबंधीच्या एका प्रॉजेक्टवर काम करण्यासाठी उत्तर युगांडच्या गुलू शहरात गेली होती. हिनाची या मुलासोबत बाजारात भेट झाली होती. ती म्हणते, 'दो-तीन वर्षांचा तो गोड छोकरा होता. मला वाटते एखाद्या लहान मुलाने मी प्रथमच इम्प्रेस झाले असेल.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, इंटरनेटवर कोणकोणत्या कॅप्शन देऊन हा फोटो शेअर होतो..
बातम्या आणखी आहेत...