आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्किल इंडिया’चा प्रारंंभ; मोदी म्हणाले - केवळ कौशल्य विकास नव्हे, उद्यमशीलताही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा "िस्कल इंडिया' अर्थात कौशल्य विकासाच्या मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रारंभ केला. या वेळी बोलताना त्यांनी चीन जसा उत्पादनातील अग्रेसर देश आहे तसाच भारत मनुष्यबळाची जागतिक राजधानी बनू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.

ग्रामीण भागातील लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्य आजमावले तर आपण जगाला चार ते पाच कोटी इतके मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ शकू. भारतीयांमध्ये क्षमता, हुशारी कौशल्य खूप आहे. जगानेही शेकडो वर्षांपासून ते अोळखले आहे. मात्र, सध्या आपण ते विसरलो आहोत. ते कौशल्य आपल्याला पुन्हा मिळवायचे असल्याने सरकारने यावर विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
जगभरात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. म्हणूनच पुढील १० वर्षांचा विचार करून आपल्याला योजना आखाव्या लागतील. गरिबी आणि बेरोजगारी आता हद्दपार होईल कारण गरिबीविरुद्ध सरकारने युद्ध पुकारले आहे, असे मोदी यांनी नमूद केले. या लढाईत गरीब भारतीय आपला सैनिक असल्योच सांगून ही लढाई आपण निश्चितपणे जिंकू, असा दृढविश्वास मोदींनी व्यक्त केला. रोजगार हाच सरकारचा प्राधान्याचा विषय आहे. यासाठी खास व्यवस्था गरजेची होती. ही व्यवस्था स्थापन करण्याच्या दिशेने कौशल्य विकास हे एक पाऊल असल्याचे मोदी म्हणाले.

२०२२पर्यंत ४० कोटी कुशल मनुष्यबळ
राष्ट्रीयस्तरावर सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकार २०२२ पर्यंत ४०.२ कोटी कुशल मनुष्यबळ तयार करेल. लोकांना ज्या क्षेत्रातील आवड आहे त्या क्षेत्रातील प्रशिक्षण त्यांना दिले जाईल. यातून रोजगार मिळेल किंवा ते स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतील.

जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे भवितव्य उज्ज्वल : जेटली
जगातआर्थिक विकासाचा वेग सध्या मंद आहे. मात्र, भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे. आपले सेवा क्षेत्र दुप्पट वेगाने वाटचाल करत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मेक इन इंडिया कार्यक्रम सुरू झाल्यापासून उत्पादन क्षेत्रानेही वेग घेतला आहे. म्हणूनच जागतिक नाणेनिधीनेही भारतातील २०१५ मध्ये आर्थिक विकासाचा वेग ७.५ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. जगात हाच दर केवळ ३.३ टक्के आहे.
{जे लोक विकासाच्या प्रक्रियेत मागे पडले आहेत त्यांच्यासाठीच स्किल इंडिया मोहीम आहे. यातून गरिबांच्या खिशात पैसे पडतील, सोबत आत्मविश्वासही वाढेल.
{देशातील ६५ टक्के लोकांचे सरासरी वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. त्यांच्यात कौशल्य विकसित झाले नाही, रोजगार मिळाला नाही तर ते आव्हान ठरू शकते. म्हणूनच युवकांना रोजगार मिळेल असे तंत्र विकसित करावे लागेल.
{लक्ष्य केवळ कौशल्य विकास हेच नाही, उद्यमशिलतेकडेही केंद्र सरकारचे लक्ष आहे. युवक जर उद्योग सुरू करू इच्छित असतील तर त्यांना कर्ज किंवा अन्य रूपात मदत आणि प्रोत्साहन दिले जाईल.
{भारतातील आयआयटी संस्थांनी गेल्या काही वर्षांत जगात अापले वेगळे मानाचे स्थान निर्माण केले आहे. आता आयटीआयची (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) खरी वेळ अाहे.
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कौशल्य विकास मोहिमेअंतर्गत आयोजित प्रदर्शनाला बुधवारी भेट देऊन येथील सादरीकरणाचे कौतुक केले.
बातम्या आणखी आहेत...