आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्किल इंडिया मिशनला चालना देण्यासाठी विविध योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्किल इंडिया मिशनला चालना देण्यासाठी १५ रोजी विविध योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. कौशल्य विकासातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तरुणांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा त्यात समावेश असेल.
या योजनांमध्ये मॉडेल स्किल लोन स्कीमची फेररचना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत नोंदणीकृत उमेदवारांना स्किल कार्ड आणि कौशल्य विकासाच्या नवीन धोरणाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ रोजी वर्ल्ड यूथ स्किल डेनिमित्त योजनांचा शुभारंभ करतील. सरकारने २०२२ पर्यंत ४० कोटी २० लाख लोकसंख्येमध्ये कौशल्य विकास गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

२००९ मध्ये याआधीचे कौशल्य विकास धोरण
चालू महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत नॅशनल स्किल्स मिशनच्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यामध्ये कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रीय धोरणाचाही समावेश आहे. या मोहिमेत उच्चस्तरीय निर्णय प्रक्रियेची व्यवस्था आहे. उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास मोहीम देशाचा एकत्रित राष्ट्रीय कार्यक्रम आहे. याआधी २००९ मध्ये कामगार मंत्रालयाने कौशल्य विकासाचे धोरण आखले होते आणि पाच वर्षांनंतर त्याचा फेरआढावा घेणे अपेक्षित होते.
पेपरच्या रूपात स्किल कार्ड देणार
मॉडेल स्किल लोन स्कीममध्ये कर्ज प्रक्रिया लवकर मंजूर करण्यावर भर दिला जाणार आहे. बँकांची लहान कर्ज देण्यातील जोखीम कमी करण्यासाठी कर्ज योजना क्रेडिट गॅरंटी फंडशी जोडली जाईल. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेतील व्यक्तींना स्किल कार्डचे वाटप केले जाईल. यानंतर पेपरच्या स्वरूपात कौशल्य प्रमाणपत्राचे वाटप केले जाईल. सध्या कार्डच्या रूपात स्किल कार्ड आहे. त्यामुळे ते पॉकेटऐवजी सहज घेऊन जाता येईल. कार्डवर क्यूआर कोड आहे. कार्डची वैधता तपासण्यासाठी कागदावरील क्यूआर कोड मोबाइल डिव्हाइसवर तपासता येऊ शकतो.