आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार अल्पसंख्याक तरुणांच्या कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर योजना लॉँच करण्याच्या प्रयत्नात आहे. कौशल्य विकास कार्यक्रमातून या समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे.
अल्पसंख्याक खात्याचे मंत्री के. रहमान खान प्रस्तावित योजना आखण्याच्या तयारीत आहेत. आपले मंत्रालय अल्पसंख्याकांसाठी नवी योजना आखत आहे. यामुळे विकासाभिमुख क्षेत्रात अल्पसंख्याकांना काम मिळेल. कौशल्य विकास, शिक्षण आणि कर्ज सुविधेचा उपयोग त्यांना होईल, अशी आशा खान यांनी व्यक्त केली. मागासवर्गीय मुस्लिमांबाबत सच्चर आयोगाने सुचवलेल्या शिफारशी लागू न केल्याबद्दल सरकारवर टीका होत आहे. त्यामुळे अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे या वर्षात इक्वल अपॉर्च्युनिटी कमिशन (ईओसी), नॅशनल डाटा बॅँक (एनडीबी) आणि डायव्हर्सिटी इंडेक्स स्थापन केला जाईल. अल्पसंख्याकांना खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रात संधी मिळावी, यासाठी या उपाययोजना केल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.