आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाचा मान्सून 103 %; सरासरीइतके पर्जन्यमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- यंदा नैऋत्य मान्सून गेल्या 50 वर्षांच्या सरासरीइतकाच म्हणजे 103 टक्के राहण्याचा अंदाज एका खासगी हवामान अंदाज संस्थेने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याकडून पुढील आठवड्यात दीर्घ कालावधीसाठी मान्सूनचा अंदाज जारी होणार आहे. त्यापूर्वी बुधवारी स्कायमेट या खासगी संस्थेने आपले अनुमान प्रसिद्ध केले.

जून ते सप्टेंबर या कालावधीत मध्य भारतातील पावसात कमीत कमी चढ-उतार होण्याचे भाकीत स्कायमेटने केले आहे. पावसाळ्यात सरासरी 103 टक्के वृष्टी होण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटचे सीईओ जतीन सिंग यांनी सांगितले. यंदा सर्वसामान्य पावसाची शक्यता 44 टक्के, त्यापेक्षा अधिक 29 टक्के, अतिवृष्टीची शक्यता 15 टक्के व्यक्त करण्यात आली आहे. कमी पाऊस 9 टक्के, तर दुष्काळाची 3 टक्के अंदाज अहवालात नमूद आहे.