आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Small Astrophycist: Four Child Of Delhi, Gurgaon Discovered Small Satalitte

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छोटे खगोलशास्त्रज्ञ: दिल्ली, गुडगावच्या चार विद्यार्थ्यांनी शोधले लघुग्रह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शाळकरी मुलांचे वय तसे खेळण्याचे, परंतु दिल्ली आणि गुडगावच्या चार विद्यार्थ्यांनी जणू ही बाब खोटी ठरवली. त्यांनी अवकाशातील दोन नवीन लघुग्रहांचा शोध लावला. भारताचा गौरव करणा-या या कामगिरीमुळे खगोल क्षेत्रातील जाणकार अवाक् झाले आहेत.


शौर्य छांबिया, गौरव पातिब (अ‍ॅमिटी इंटरनॅशनल स्कूल), बालचंद्र रौथू व आयुष गुप्ता (रियान इंटरनॅशनल स्कूल) अशी या बालसंशोधकांची नावे आहेत. हे चौघे दोन वेगवेगळ्या पथकांमध्ये कार्यरत होती. इंटरनॅशनल सायंटिफिक कम्युनिटीच्या वतीने या संशोधनाला दुजोरा देण्यात आला आहे. नवीन ग्रहांना 2013 एलएस 28, 2013 पीआर अशी नावे देण्यात आली आहेत. नवीन ग्रहांचा समावेश लवकरच पॅरिसच्या इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या (आयएयू) सूचित होणार आहे. त्यासाठी प्रतीक्षा केली जात आहे, अशी माहिती एसपीएसीईचे संचालक सी.बी. देवगण यांनी दिली. आयएयू ही खगोलतज्ज्ञ व अंतराळवीर यांच्याकडून मान्यताप्राप्त अशी संस्था आहे. या संस्थेमध्ये जगभरातील संशोधकांचा सहभाग आहे.


नवीन लघुग्रह शोधून काढणा-या बाल संशोधकांचे दोन चमू तयार करण्यात आले होते. त्यांनी अ‍ॅस्ट्रोमेट्रिका पद्धतीने हा अभ्यास केला. आकाशाच्या विशिष्ट भागाचा डेटा गोळा करण्यात येतो. 24 आणि 32 इंची दुर्बिणीच्या साह्याने रात्रीच्या वेळी आकाशाचे छायाचित्र टिपण्यात आले.