आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागडण्याच्या वयात उभारली कोट्यवधींची कंपनी, हे आहेत Master बिझनेस मॅन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खेळण्या बागडण्याचे वय आणि कोट्यवधींच्या कंपनीचे मालक. ठरवले तर काहीही अवघड नसते. भारतात अशी अनेक Masters मुले आहेत ज्यांनी अगदी कमी वयातच स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता आणि आज ते बॉस बनले आहेत. हे सर्व लहान नक्कीच आहेत, पण फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग पासून गूगलच्या दिग्गजांपर्यंत सर्वांनी त्यांना दाद दिली आहे. अशाच पाच मास्टर्सबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. वय कमी असल्याने कंपन्या त्यांच्या नावावर रजिस्टर्ड नाही पण तरीही उद्योग जगतात क्रिएटिव्ह आयडियाजमुळे त्यांची चलती आहे.

फोटो - श्रवण कुमारन आणि संजय कुमारन

14 वर्षांचा श्रवण आणि 12 वर्षाचा संजय हे देशातील सर्वात लहानगे उद्योगपती आहेत. दोघेही चेन्नईचे राहणारे आहेत. या दोघांनी मिळून 2011 मध्ये ‘गो डायमेन्शन्स’ अॅप लाँच केले होते. अॅप तयार करण्यात या दोघांचाही हातखंडा आहे. त्यांनी आतापर्यंत 11 अॅप डेव्हलप केले आहेत. त्यांचे अॅप्स अॅपल आणि गूगल दोन्ही प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. त्याचे सुमारे 35 हजारहून अधिक डाउनलोड झाले आहेत. या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी आयआयएम - बेंगळुरु आणि टेडेक्ट कॉन्फ्ररन्समध्ये प्रेझेंटेशनही दिले आहे. फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गही या दोघांना भेटला आहे. श्रवण कंपनीचा प्रेसिडेंट आणि संजय सीईओ आहे. दोघांचे वय कमी असल्याने भारतीय कायद्यानुसार त्यांची कंपनी कुटुंबातील सदस्यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच आणखी काही 'Master' उद्योगपतींबाबत...

बातम्या आणखी आहेत...