आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीसाठी लोकसंख्या नव्हे, आर्थिक स्थितीआधारे निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्मार्ट सिटी निवडीत शहराची लोकसंख्या नव्हे, तर आर्थिक स्थिती हा आधार असेल. आधी निघालेल्या टिपणानुसार लोकसंख्या मुख्य आधार होता. नगरविकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या मते, राज्याला लोकसंख्या, आर्थिक स्वावलंबन, आर्थिक व ऐतिहासिक महत्त्व आदी मुद्द्यांवरून शहरांचा कोटा दिला जाईल. पहिल्या वर्षी १० ते २० शहरांची िनवड शक्य आहे. निवड न होणारी शहरे दुसऱ्या वर्षी पुन्हा भाग घेऊ शकतील.
व्हिजन आराखडा
१. राहणीमानाचा दर्जा उंचावेल, रोजगार संधी वाढतील. आरोग्य, शिक्षणाचा दर्जा सुधारेल अशी योजना असावी.
२. शहरात ५० एकरवर कमर्शियल क्षेत्राचा विकास केला जाणार. सुरक्षा, परिवहन व पायाभूत सुविधा.
३. जुन्या निवासी क्षेत्रात ३०० एकरच्या भागाचा विकास. यात सर्व पायाभूत सुविधा.
४. पाचशे एकरवर ग्रीन सिटी. वायफाय, आधुनिक ट्रान्सपोर्ट, चिल्ड्रन्स पार्क.