आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी असेल स्मार्ट सिटी : तरुणांना सहज कळेल नोकरीची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्मार्ट सिटीमध्ये एम्सच्या धर्तीवर ट्रॉमा सेंटर आणि इर्मजन्सी रिस्पॉन्स सिस्टिम असेल, जेणेकरून प्राण वाचवताना वेळेचा अपव्यय होणार नाही. परंतु एक महत्त्वाची सुविधा तरुणांसाठी असेल. एकत्रित डेटाबेसच्या साहाय्याने पात्रतेनुसार नोकरी कोठे मिळेल, हे शोधणे तरुणांना सहज शक्य होईल.

2015 मध्ये अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदर स्मार्ट सिटी डीपीआर तयार होईल, असा दावा नगरविकास मंत्रालयाच्या उच्चाधिकार्‍यांनी केला आहे. द वर्ल्ड बँकेचे नगर विकासतज्ज्ञ बरजोर मेहता म्हणाले, 25 वर्षांचा विचार करून योजना तयार केल्या पाहिजेत. त्यामुळे अशी शहरे दरवर्षी भर पडणार्‍या 3 कोटी लोकसंख्येचा ताण सहन करून त्यादृष्टीने व्यवस्था करू शकतील. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सच्या सहायक प्रोफेसर डेबोलीना कुंटू म्हणाल्या, सर्वांकडे मोबाइल असल्याने जास्तीत जास्त सेवा मोबाइलद्वारेच जोडण्यात येतील. स्मार्ट सिटीच्या रचनेमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स नवी दिल्ली, अँडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया हैदराबाद आणि सेंटर फॉर इन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी अहमदाबादचाही समावेश आहे. राज्य सरकारांशीदेखील याबाबत चर्चा सुरू आहे.

मोबाइलवरच डॉक्टरांचा सल्ला
- इस्रायलच्या धर्तीवर ‘मिनिमम लॉस ऑफ लाइफ’चे लक्ष्य. आजारांवर मोबाइल किंवा ऑनलाइन डॉक्टरांकडून सल्ला घेता येईल.
- मोबाइलवरच आजारांचे कोडिंग होईल. उदा : एक- फ्रॅक्चरसाठी, दोन- गरोदरपणा आदी.
- गंभीर आजारी किंवा जखमी रुग्णवाहिकेमध्ये बसल्यानंतर त्वरित संबंधित डॉक्टरांकडे अलर्ट जाईल. रुग्ण पोहोचेपर्यंत उपचाराची तयारी होईल.

माहितीचा एकत्रित ‘डाटाबेस’
- पात्र उमेदवारांची माहिती कंपन्यांना कळावी यासाठी स्मार्ट सिटीमध्ये एक डाटाबेस तयार केला जाईल. आपल्या शिक्षणानुसार नोकरी कुठे मिळेल, याची माहितीही उमेदवारांना मिळू शकेल.
- शाळांमध्ये स्मार्टबोर्डवर इंटरॅक्टिव्ह लर्निंगला प्रोत्साहन. प्रोजेक्टरवर दिलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जावा याचा सर्व शाळांना पर्याय दिला जाईल. जपान-चीनमध्ये ही शिक्षण पद्धती रूढ होत आहे.