आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी असेल स्मार्ट सिटी : पिण्याच्या पाण्यासाठी विशेष पुरवठ्याची सोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्मार्ट सिटीत पिण्याचे पाणी आणि अन्य वापराचे पाणी वेगवेगळ्या मार्गाने पुरवण्याची योजना आहे. यासह पाण्याच्या पुनर्वापरालाही प्रोत्साहन दिले जाईल. मंत्रालयात स्मार्ट सिटीवर सादरीकरण करणारे हैदराबाद येथील अँडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडियाचे व्यवस्थापक व्ही. श्रीनिवास चारी म्हणाले, स्मार्ट सिटीत पाण्याची वितरण व्यवस्था सुधारणे व गळती थांबवणे हा पहिला उद्देश आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी सिंगापूर मॉडेलचे उदाहरण मंत्रालयात सादर करण्यात आले आहे.

या शहरांमध्ये उद्याने नसून उद्यानात शहर वसल्याची ही संकल्पना आहे. प्रत्येक स्मार्ट सिटीत घरगुती गॅस, सिलिंडरऐवजी पाइपलाइनने गॅस पुरवण्यावर विचार सुरू आहे. सध्या काही शहरांमध्येच ही सुविधा आहे. ई-गव्हर्नन्सलाही प्रोत्साहन दिले जाईल. त्यामुळे पाणीपट्टी, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, पुननरेंदणी व इतर सेवांसाठी रांगेत ताटकळत राहण्याची गरज नसेल. मोबाइल किंवा ऑनलाइन अर्ज, परवानगी मिळवता येईल व बिलही भरता येईल. पर्यावरण नियोजन व तंत्रज्ञान केंद्राच्या अधिव्याख्याता डॉ. दर्शनी महादेविया सांगतात, सुरुवातीला स्मार्ट सिटी म्हणजे पर्यावरणाला महत्त्व असलेली ‘नो कार्बन सिटी’ असा अर्थ होता. पण आता तंत्रज्ञानावर भर आहे.
विभागनिहाय मागणीनुसार वीज-पाणी वितरण व्यवस्था
- स्मार्ट सिटीत वीज व पाणीपुरवठय़ाचा 100 दिवसांचा तपशील गोळा केला जाईल. त्यानुसार मागणी निश्चित केली जाईल. व त्यापुढील पुरवठय़ाची योजना आखली जाईल.
- बंगळुरूच्या धर्तीवर पेयजल व अन्य वापराच्या पाण्याचा पुरवठा वेगवेगळा होईल. पाण्यासह गॅस वितरण प्रणालीवरही कॉम्प्युटरद्वारे रेखरेख ठेवली जाईल.
- पाणी किंवा गॅस पाइपलाइनमध्ये गळती झाल्यास तत्काळ अलर्ट मिळेल व जीपीएसद्वारे संबंधित ठिकाण हेरून दुरुस्ती केली जाईल.

कचरा पेट्यांवरही जीपीएसद्वारे देखरेख
- सिंगापूरच्या धर्तीवर कचरा पेट्यांवर जीपीएसद्वारे क्षणोक्षणी देखरेख ठेवली जाईल. कर्मचार्‍यांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाईल. विविध श्रेण्यांनुसार कचरा उचलला जाईल. उदा. प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक व घरातील कचरा, इत्यादी.
- धोकादायक कचर्‍यासाठी वेगळे डंपिंग यार्ड तयार केले जाईल. उर्वरित कचर्‍यासाठी प्रक्रिया केंद्र विकसित केले जातील.