आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smiriti Irani\'s Educational Qualification Creates Controversy

मनुष्यबळ विकासमंत्र्यांच्या शिक्षणावरून वाद, स्मृती इराणी बीकॉम की बारावी पास?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी या शैक्षणिक पात्रतेच्या वादात अडकताना दिसत आहेत. स्मृती इराणी यांनी 2004 मध्ये दिल्लीतून कपिल सिब्बल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्या वेळी बीकॉम पास असल्याचे नमूद केले होते. परंतु या वेळी अमेठी येथून लढताना आपण बारावी पास असल्याचे अर्जात नमूद केले आहे. काँग्रेसने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर भाजपने काँग्रेसवर प्रतिहल्ला चढवला आहे. मंत्री उमा भारती यांनी विचारले की स्मृती यांचे शिक्षण विचारणार्‍यांनी प्रथम सोनिया गांधींना त्यांची शैक्षणिक पात्रता विचारावी. त्या गेल्या सरकारला निर्देश देत राहिल्या. दुसरीकडे काँग्रेस, जदयूसह काही पक्षांनी मंत्रिपद व शिक्षणाचा परस्परसंबंध लावणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. दिग्विजयसिंह यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, मुद्दा मंत्री वा पंतप्रधानांच्या योग्यतेचा नाही, मोदींनी मुरली मनोहर जोशी यांना डावलून स्मृतींना निवडल्याचा आहे. माजी मंत्री पल्लम राजू यांनी ट्विट केले, स्मृती यांचे नशीब चांगले आहे, मनुष्यबळ विकास मंत्रालयात समर्पित आणि अत्यंत मेहनती अधिकारी आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, बाकी 44 मंत्र्यांचे शिक्षण