आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smita Thackeray, Nilesh Rane Account Holder In Swiss Bank

स्विस बँकेच्या खातेदारांत स्मिता ठाकरे, नीलेश राणे - काळ्या पैशाबाबत गौप्यस्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ अहमदाबाद/लंडन / बर्न - काळ्या पैशाबाबत सोमवारी मोठा गौप्यस्फोट करण्यात आला. शोध पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने एचएसबीसीच्या स्वित्झर्लंड व अन्य शाखांतील १,१९५ भारतीय खातेदारांची नावे उघड केली. त्यात उद्योगपती, नेते, हिरे व्यापारी आहेत. या यादीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे, काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या पत्नी नीलिमा व मुलगा नीलेश यांचे नाव आहे. या खात्यांत २००७पर्यंत ४.१ अब्ज डॉलर (सुमारे २५,४२० कोटी रुपये) जमा होते.

नव्या यादीतील बहुतांश नावे सरकारला माहीत होती. पुरावे गोळा केले जात आहेत. बेकायदेशीर खातेदारांची चौकशी केली जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले.या गौप्यस्फोटामुळे काळ्या पैशाची चौकशी करणाऱ्या एसआयटीची व्याप्ती वाढली आहे. एसआयटीचे प्रमुख न्यायमूर्ती एम.बी. शाह म्हणाले की, आम्ही वृत्तपत्रांतील बातम्यांवरून कारवाई करू शकत नाही. कारवाई करण्याआधी या दाव्यातील सत्यता पडताळून पाहिली जाईल. तर आम्ही ३१ मार्चपर्यंत चौकशी पूर्ण करू, असे एसआयटीचे उपप्रमुख अरिजित पसायत यांनी म्हटले आहे. दक्षता संचलनालय आणि सीबीडीटीला नव्या नावांशी संबंधित माहिती गोळा करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
पुढे वाचा चोरलेल्या माहितीवर यादी