आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुक्यामुळे दिल्लीतील वाहतूकीवर परिणाम; 94 रेल्वे लेट, 6 आंतरराष्ट्रीय विमानांवर परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवामान खात्याने सांगितले आहे, की डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही धुके असण्याची शक्यता आहे. - Divya Marathi
हवामान खात्याने सांगितले आहे, की डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही धुके असण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - राजधानीत आज (गुरुवार) पुन्हा दाट धुके पसरले आहे. व्हिजिबिलीटी कमी असल्यामुळे रेल्वे आणि एअर ट्रॅफिकवर त्याचा परिणाम झाला आहे. गुरुवारी सकाळी 94 रेल्वे लेट आहेत, एक गाडी रद्द करण्यात आली तर 15 पेक्षा जास्त गाड्या रि-शेड्यूल करण्यात आल्या आहेत. दाट धुक्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील येणाऱ्या - जाणाऱ्या फ्लाइट्सवर परिणाम जाणवत आहे. 6 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि 7 देशांतर्गत फ्लाइट लेट आहे, 1 देशांतर्गत उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
बुधवारी कशी होती परिस्थिती
बुधवारी व्हिजिबिलीटी कमी असल्यामुळे 8 आंतरराष्ट्रीय आणि 5 देशांतर्गत उड्डाणांवर परिणाम झाला आहे. 3 आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स डायव्हर्ट करण्यात आले आहेत. दाट धुक्यामुळे 100 हुन अधिक रेल्वेंवर परिणाम झाला आहे. 81 रेल्वे लेट झाल्या आहेत. 21 रेल्वेंचा वेळ बदलण्यात आला आहे. 3 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने सांगितले आहे, की डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही धुके असण्याची शक्यता आहे.
- एएनआयच्या वृत्तानुसार, दाट धुक्यामुळे आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सला उशिर झाला आहे. याचा परिणाम बगदाद-दिल्‍ली व्हाया लंडन, अबू धाबी-दिल्‍ली, मस्‍कत-दिल्‍ली व्हाया जयपुर, दुबई-दिल्‍ली व्हाया जयपुर, कुवैत-दिल्‍ली, अदीस अबाबा-दिल्‍ली, फ्रँकफोर्ट -दिल्‍ली, बर्मिंगहम-दिल्‍ली यांचा समावेश आहे.
- देशांतर्गत विमानांमध्ये हैदराबाद-दिल्ली, अहमदाबाद-दिल्ली, अमृतसर-दिल्ली, डेहरादून-दिल्ली, जयपूर-दिल्ली, लखनऊ-दिल्ली, बंगळुरु-दिल्ली आणि मुंबई-दिल्ली यांचा समावेश आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...