आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मृती इराणींची चप्पल तुटली, चर्मकाराला दिले 10 ऐवजी 100 रुपये; PHOTO व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर चर्चेपासून दुर असलेल्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी एका फोटोमुळे चर्चेत आल्या आहेत. मात्र, याच्याशी कोणताही वाद जोडलेला नाही. झाले असे, की एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात स्मृती इराणी त्यांची चप्पल शिवण्यासाठी दुकानाबाहेर बसलेल्या दिसतात.
चर्मकाराला दिले १० ऐवजी १०० रुपये
- इशा फाउंडेशनच्या एका कार्यक्रमासाठी स्मृती इराणी तामिळनाडूमध्ये गेल्या होत्या.
- फ्लाइटमधून उतरल्यानंतर एअरपोर्टवर त्यांची चप्पल तुटली होती.
- त्यानंतर एअरपोर्टपासून १६ किलोमीटरवर पेरुर येथे त्यांना एका चर्मकाराचे दुकान दिसले.
- चर्मकार स्मृती यांची चप्पल दुरुस्त करत होता तेव्हा त्या दुकानाबाहेर एका स्टूलवर बसल्या होत्या.
- चप्पल शिवून दिल्यानंतर चर्मकाराने त्यासाठीचे १० रुपये झाल्याचे सांगितले. यावर स्मृतींनी त्यांच्या पर्समधून १०० रुपये काढून दिले.
- परंतू चर्मकाराकडे त्यांना देण्यासाठी सुटे ९० रुपये नव्हते. तेव्हा स्मृती म्हणाल्या, चेंज वेंडा. अर्थात सुटे राहू द्या.
- इराणी यांच्यासोबत तामिळनाडू भाजपचे महासचिव वनाथी श्रीनिवासन होते. त्यांनीच त्यांना असे म्हणण्यास सांगितले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोशल मीडियावर कशा आल्या प्रतिक्रिया..
बातम्या आणखी आहेत...