आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिकेतील सून \'तुलसी\' आहे नरेंद्र मोदी ब्रिगेडची स्पेशल \'महिला लेफ्टनंट\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - छोट्या पडद्यावर जवळपास आठ वर्षे चाललेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधील तुलसी वीरानी अर्थात स्मृती इराणी गेल्या काही वर्षांपासून टीव्ही सिरियलमध्ये फार कमी दिसते. याचे कारण आहे स्मृतीचे राजकारण. स्मृती यांनी आता भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातात घेऊन आता राजकारणालाच करिअर म्हणून निवडले आहे. यावर्षी त्यांना भाजपचे उपाध्यक्षपद मिळाले आहे. 37 वर्षांच्या स्मृती म्हणतात, जन्मापासूनच माझे भाजपशी नाते आहे. भाजपने गुजरातमधून त्यांना राज्यसभेवर पाठवले आहे. त्यामुळे सभागृहात आणि बाहेरही त्या भाजपची बाजू उचलून धरत असतात. सध्या त्यांच्यावर सरदार पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची जाबाबदारी आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पावर स्मृती देखरेख ठेवत आहेत. सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी या प्रकल्पाचा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते शिलान्यास झाला. त्याच दिवशी स्मृती यांनी या प्रोजेक्टसंबंधी लोकांची एक कार्यशाळा घेतली.